देशी दारूचं दुकानच फोडलं, त्यानं रिचवले 27 बॉक्स

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – शहरातील घरफोड्यांचे सत्र सुरूच असून, आता चोरटे रोकड अन् सोन्यांसोबतच दारूही चोरून नेहू लागले आहेत. खडकीत चोरट्यांनी बंद देशी दारूचे दुकान फोडून तब्बल 27 बॉक्स चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.

याप्रकरणी धनराज सुर्यवंशी (वय 60, रा. बोपोडी) यांंनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकडेवाडी येथील बोपोडी चौकात मुंबई-पुणे महामार्गावर देशी दारूचे दुकान आहे. फिर्यादी याठिकाणी काम करतात. दरम्यान, नेहमी प्रमाणे शनिवारी रात्री दुकान बंद केले. त्यानंतर अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. तसेच, 48 बाटल्यांचे एकूण 27 बॉक्स व इतर साहित्य असा एकूण 61 हजार 700 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. चोरट्यांनी येथील सीसीटीव्हीचा डिव्हीआर तसेच डिस्प्लेही चोरला आहे. रविवारी हा प्रकार उघडकीस आला. अधिक तपास खडकी पोलीस करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा –