कोयत्याच्या धाकाने रिक्षा पळविली

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – कोयत्याचा धाक दाखवून चोरट्यांनी रिक्षाचालकाकडून ६०० रुपयांच्या रोकडसह रिक्षा पळवून नेली. ही घटना दोन दिवसांपुर्वी रात्री नउ वाजण्याच्या सुमारास सोलापूर बाजार रस्ता परिसरात घडली. याप्रकरणी लतिफ काझी (वय ५०, रा. कोंढवा ) यांनी लष्कर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लतिफ रिक्षाचालक असून दोन दिवसांपुर्वी ते सोलापूर बाजार रस्ता परिसरातून जात होते. त्यावेळी तिघाजणांनी त्यांना अडवून कोयत्याचा धाक दाखवित ६०० रुपयांची रोकड हिसकावून घेतली. त्यांच्या ताब्यातील रिक्षा घेउन चोरटे पसार झाले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक एम. व्ही. राउत अधिक तपास करीत आहेत.

You might also like