मास्क आणण्यासाठी महिला गेली बाजारात, चोरट्यांनी घरावर मारला डल्ला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मास्क आण्यास गेलेल्या महिलेच्या घरी चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना हडपसर परिसरात घडली. चोरट्यांनी घरफोडीकरून 46 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.
याप्रकरणी 25 वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्रत्येकजन मास्कचा वापर करत आहे. तत्पुर्वी महिला हडपसरमधील पवार कॉलनी परिसरात राहते. दरम्यान, त्या दोन दिवसांपुर्वी सकाळी घराला कुलूप लावून काही अंतरावर मास्क आणण्यासाठी गेल्या होत्या. त्याचवेळी चोरट्यांनी त्यांच्या घरावर डल्ला मारला असून, घरातून 46 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. त्या मास्क घेऊन आल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. अधिक तपास हडपसर पोलीस करत आहेत.

दरम्यान, देशभरात कोरोना रोगाने थैमान घातले आहे. राज्यातही त्याची लागन झाली असून, पुण्यात आतापर्यंत 9 रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे प्रत्येकजन भयभित असून, काळजी घेत आहे. सर्वांनी तोंडाला मास्क घालावे, असे आवाहन करण्यात येत आहे. त्यामुळे हे मास्क घेण्यासाठी लगभग लागली आहे.

काही दिवसांपुर्वीच एका मेडिकलमधून तेथील काम करणार्‍या कामगारानेच मास्क आमि काही वस्तू चोरून नेल्या होत्या. आता मास्क आणण्यास गेल्यानंतर चोरट्यांनी घरफोडले आहे.