स्वारगेट बसस्थानकात 22 हजारांची रोकड चोरली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – स्वारगेट बसस्थानकातून एसटीत प्रवेश करणार्‍याजवळील 22 हजाराची रोकड चोरुन नेल्याची घटना घढली. बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली.

याप्रकरणी 52 वर्षीय व्यक्तीने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मूळचे नगर जिल्ह्यातील वनकुटे गावचे असून कामानिमित्त पुण्यात आले होते. त्यानंतर काल दुपारी ते पांगरी येथे जाण्यासाठी स्वागरेट बसस्थानकात एसटीची वाट पाहत थांबले होते. त्यानंतर बसमध्ये प्रवेश करीत असताना चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेउन त्यांच्या खिशातील 21 हजार 600 रुपयांची रोकड चोरुन नेली. याप्रकरणी स्वारगेट पोलिस अधिक तपास करीत आहेत.