पुण्यातील FC रस्त्यावरून कारमधून 7 लाखांचा कॅमेरा चोरीला

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन – रस्त्याच्या कडेला कार पार्ककरून थांबलेल्या चालकाचे लक्ष विचलीतकरून कारमधून सात लाख रुपयांचा कॅमेरा चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. ही घटना एफसी रोडवरील चॅम्पियन स्पोटर्स दुकानासमोर घडली.

याप्रकरणी किरण कांबळे (वय 29, रा. दत्तवाडी) यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दुचाकीवरील दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण खासगी कारवर चालक आहे. संबंधित कार एका वृत्तवाहिनीकडे भाड्याने आहे. शनिवारी रात्री किरण एफसी रोडवरील चॅम्पियन स्पोटर्स दुकानासमोर मोटार पार्क करुन बसले होते. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या दोघा चोरट्यांनी त्यांना मोटारीतून खाली काहीतरी पडल्याचे खुणावले. त्यामुळे किरण मोटारीतून खाली उतरुन वस्तूचा शोध घेत असताना दुसर्‍या चोरट्याने मोटारीत शिरुन 7 लाख रुपये किंमतीचा कॅमेरा चोरुन नेला. घटनेचे चित्रीकरण सीसीटीव्हीत कैद झाले आहे. चोरट्यांचा शोध घेतला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. अधिक तपास उपनिरीक्षक जयवंत जाधव करत आहेत.