Pune : वानवडी आणि भारती विद्यापीठ परिसरात चोरटयांनी बंद फ्लॅट फोडले, 3 लाखाचा ऐवज लंपास

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   शहरात घरफोड्या सुरूच असून, पुन्हा एकदा वानवडी व भारती विद्यापीठ चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडले असून, तीन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. काही केल्या या घटना रोखण्यात पोलिसांना यश येत नसल्याचे दिसत आहे.

याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात 37 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचा महंमदवाडी रस्त्यावर सिमेंट कॉन्ट्रॅक्ट मिक्सिंग करण्याचा ॲडव्हान्स रेडीमिक्स प्लांट आहे. लॉकडाऊन असल्याने तो काही दिवसांपासून हा बंद आहे. त्याठिकाणी कोणी नसल्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी 11 ते 14 मार्च या कालावधीत तब्बल 64 हजार रुपये किमतीचे सामान चोरून नेले आहे. त्यांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. अधिक तपास पोलीस हवालदार रासगे हे करत आहेत. तर दुसरी घटना कात्रज-कोंढवा रस्त्यावर घडली असून, जेष्ठ नागरिकाचे घर उघडे असताना चोरट्याने घरातून 2 लाख 15 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याबाबत 85 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 2 एप्रिल रोजी हा प्रकार घडला आहे. त्यांचा घराचा दरवाजा उघडा असताना चोरट्यानी आत शिरून ऐवज चोरला आहे.