Pune : बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ५ लाख ९० हजारांचे सोन्याचे दागिने लांबविले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील ५ लाख ९० हजारांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना फुरसुंगी भागात घडली. क्रितिका मिश्रा (वय २८,रा. हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रितिका या फुरसुंगी परिसरात राहण्यास आहेत. त्या कुटुंबासोबत येथे राहतात. त्या गेल्या महिन्यात बाहेरगावी गेल्या होत्या. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील ५ लाख ९० हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. त्या गावाहून परत आल्यानंतर क्रितिका यांना घरात चोरी झाल्याचे दिसून आले. अधिक तपास उपनिरीक्षक सौरभ माने करत आहेत.

You might also like