Pune : हडपसरमधील उच्चभ्रू सोसायटीत चोरट्यांचा धुमाकूळ, 35 तोळे सोनं अन् 1 लाख लंपास; पोलिसांना आव्हान देत त्या चोरट्यांनी केला चोरी डान्स, व्हिडीओ व्हायरल (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात घरफोड्या करून टोळ्या मालामाल होत आहेत; पण त्या रोखण्यात पोलिसांना यश येत नसताना आता याच टोळ्यांनी पुणे पोलिसांना घरफोडीनंतर “चोरी डान्स” करत आवाहन देऊन “दाखवा पकडून” असेच म्हणत असल्याचे दिसत आहे.

 

हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत काळेपडळ परिसरात दोन दिवसांपूर्वी चोरट्यांनी बंद फ्लॅट फोडला. उच्चभ्रू सोसायटीत शिरून या चोरट्यानी घर फोडले. येथून 35 तोळे सोने व 1 लाखांची रोकड चोरीला गेली होती. आता या चोरट्यानी जाताना “खुश” होत सोसायटीत असणाऱ्या सीसीटीव्ही समोर येत “चोरी डान्स” केला आहे. त्यात चार चोर आहेत. हातात कटावणी सारखे हत्यार आहेत. तर चेहऱ्यावर रुमाल बांधलेला आहे.