Pune : ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील 40 हजारांची सोन्याची चैन चोरट्यांनी हिसकावली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोथरूड भागात मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील 40 हजार रुपयांची सोन्याची चैन सोनसाखळी चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून नेल्याची घटना घडली. शुक्रवारी हा प्रकार घडला.

या प्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात 67 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकीवरील दोन व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांची मैत्रीण शुक्रवारी सकाळी फिरण्यासाठी गेल्या होत्या. कर्वेनगर येथील स्टुडिओ इंटेरियर बंगलोसमोर आल्यानंतर पाठीमागून दुचाकीवर त्यांच्याजवळ आल्या. त्यांनी फिर्यादी यांच्या गळ्यातील 40 हजार रुपये किमतीचे सोन्याची भोरमाळ हिसकावून नेली. फिर्यादी यांनी आरडा-ओरडा केला. पण, तोपर्यंतच चोरटे पसार झाले. अधिक तपास सहायक निरीक्षक डी. डी. गाडे करत आहेत.

You might also like