Pune : दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना अटक

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना पोलिसांनी अटक(arrest) केले. भारती विद्यापीठ पोलिसांनी त्यांच्याकडून कोयते, पिस्तूलासारखा लॉटर पिस्तूल, दोन मोबाईल असा ऐवज जप्त केला आहे. कात्रज भागात ही कारवाई केली आहे. विशाल जाधव (वय ३२) गणेश चव्हाण (वय २३) सुनील वसवे (वय २३ सर्व रा. बिबवेवाडी) अशी अटक (arrest)केल्याल्यांची नावे आहेत. या प्रकरणी पोलीस नाईक उत्तम नंदकुमार तारु (वय ४०) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपुर्वी गुन्हे शाखेचे पथक कात्रज परिसरात पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी चौगुले इंडस्ट्रीजकडे जाणाऱ्या अंधारात वडाच्या झाडाखाली चौघेजण संशयास्पद हालचाली करीत असल्याचे पोलिसांना दिसून आले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कोयते, मोबाईल, लॉटर पिस्तूल मिळून आले. चौकशीत त्यांनी दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची कबुली दिली. अधिक तपास सहायक निरीक्षक जयवंत जाधव करीत आहेत.