पुणे : पोलीसनामा ऑनलाईन
घराशेजारी राहणाऱ्या विवाहीत महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला तीन वर्षांची सक्त मजुरी आणि ५ हजार रुपयांचा दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी देशपांडे लष्कर न्यायालय यांनी ही शिक्षा सुनावली.
[amazon_link asins=’B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d2f2ec5f-a6bf-11e8-b6a5-975593bc3b5b’]
रवींद्र निवृत्ती कामठे (वय -३० रा. मधलावाडा, शिवराज चौकाजवळ, कोंढवा बुद्रुक) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी २६ वर्षीय पिडित महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पिडित महिला आणि आरोपी हे एकाच परिसरात राहतात. पिडित महिला ही एका भाड्याच्या खोलीमध्ये राहत होती. आरोपी हा या महिलेकडे सारखा पाहत असायचा. परंतु, भाड्याच्या घरात रहायचे असल्याने पिडित महिलेने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, घटनेच्या दिवशी आरोपीने महिला घरात ऐकटी असताना घऱात जाऊन तिचा विनयभंग केला. पिडित महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात आरोपी कामठे विरुद्ध फिर्य़ाद दिली.
पोलिसांनी कामठे याच्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक अंकुश करचे, पोलीस शिपाई विलास उकिर्डे यांनी या गुन्ह्याचा तपास करुन न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. सर्व साक्षीपुरावे तपासून न्यायालयाने आरोपीला तीन वर्षांची सक्त मजुरी आणि पाच हजार रुपयांचा दंडाची शिक्षा सुनावली.
[amazon_link asins=’B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’db7ff332-a6bf-11e8-b298-79d6643490c1′]
या खटल्यामध्ये आरोपीच्या वतीने अॅड. राहुल लोणंदकर यांनी काम पाहिले तर या खटल्यात कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक लोखंडे, सहायक पोलीस फौजदार कोद्रे, पोलीस हवालदार नलावडे यांची विशेष सहकार्य लाभले. सरकारच्या बाजूने अॅड रजनी तहसीलदार आणि अॅड. बी.आर. पाटील यांनी काम पाहिले.