Pune To Goa Luxury Bus Accident | पुण्याहून गोव्याला जाणारी लक्झरी बस करुळ घाटात जळाली; 37 प्रवासी थोडक्यात बचावले

वैभववाडी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune To Goa Luxury Bus Accident | पुण्याहून गोव्याला जाणार्‍या मनिष ट्रॅव्हल्सच्या (Manish Travels Pune) लक्झरी बसने रस्त्यातच पेट (Burning Bus) घेतला़ सुदैवाने सर्व प्रवाशांना तातडीने खाली उतरविण्यात आल्याने कोणतीही जिवीत हानी झाली नाही. ही घटना वैभववाडी एडगाव घाडीवाडीजवळ आज (दि. 3 फेब्रुवारी) पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास घडली.

 

मनिष ट्रॅव्हल्सची ही लक्झरी बस पहाटे गोव्याच्या दिशेने जात होती. पहाटेची वेळ असल्याने सर्व प्रवासी गाढ झोपेत होते.
करुळ घाट उतरल्यानंतर एडगाव जवळ बस आली असताना बसने अचानक पेट (Fire in Luxury Bus) घेतला.
हा प्रकार चालकाच्या लक्षात येताच त्याने बस थांबविली. यावेळी बसमध्ये ३७ प्रवासी होते. चालकाचा आरडाओरडा ऐकून सर्व प्रवासी जागे झाले. प्रवासी तातडीने खाली उतरताच बसमधून धुराचे लोळ येऊ लागले व बसने मोठा पेट घेतला (Pune To Goa Luxury Bus Accident). कणकवली (Kankavli Police Station) , कुडाळ पोलीस ठाण्याशी (Kudal Police Station) संपर्क साधून अग्निशामक बंब आणण्यात आले. मात्र तोपर्यंत संपूर्ण बस जळून खाक झाली होती. या घटनेने घाटातील वाहतूक दोन तास ठप्प झाली होती.

 

Web Title :- Pune To Goa Luxury Bus Accident | Luxury bus from Pune to Goa caught fire in Karul Ghat 37 passengers briefly escaped

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा