Coronavirus : ‘कोरोना’मुळं पुण्यात आज सकाळपासून दुपारपर्यंत 3 जणांचा बळी, मृतांचा आकडा 11 वर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं आहे. देशात आणि महाराष्ट्रात देखील कोरोनामुळं परिस्थिती बिकट बनली आहे. पुण्यातील परिस्थिती देखील अतिशय गंभीर आहे. पुण्यात बुधवारी दुपारपर्यंत 3 जणांचा कोरानामुळं मृत्यू झाला आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये म्हणून वेळावेळी आवाहन केलं आहे. त्यामुळं पुण्यातील मृतांचा आकडा आता 11 वर पोहचला आहे. मृत्यू झालेल्यापैकी एकजण ससून, दुसरा नायडू हॉस्पीटलमध्ये तर तिसरा रूग्ण एका खासगी रूग्णालयात उपचार घेत होता.

बुधवारी दुपारपर्यंत 3 जणांचा मृत्यू मृत्यू झाला आहे. पुण्यात बुधवारी सकाळपासून 3 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळं पुणे मनपा आणि पुणे पोलिसांनी शहरातील काही परिसर सील केला आहे. 4 पोलिस ठाण्याच्या हद्दीतील परिसरात संपुर्णपणे संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

दरम्यान, पुण्यात बुधवारी सकाळपासून दुपारपर्यंत 5 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त काही वृत्त वाहिन्यांवर झळकलं होतं. त्यावर विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी पुण्यात बुधवारी तिघांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळं पुण्यातील मृतांचा आकडा हा 11 वर पोहचला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like