धक्कादायक ! पुण्यातील पिंपरीमध्ये 72 डॉक्टर, नर्स ‘क्वारंटाईन’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  अपघातात जखमी झालेल्या रुग्णाने डॉक्टरांनी उपचार केले. त्यानंतर आता शनिवारी तो पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्याच्यावर शस्त्रकिया करणारे डॉक्टर, परिचारिका, हॉस्पिटलमधील इतर कर्मचारी अशा 72 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

खडकी येथील एकाचा अपघात झाल्याने 31 मार्च रोजी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्याला अंतर्गत रक्तस्त्राव झाला होता. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करुन तो थांबविला. दरम्यान, हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरु असताना त्याला ताप आला. त्याचा ताप 2 दिवस न उतरल्याने डॉक्टरांना संशय आला. तेव्हा त्यांनी या रिक्षाचालकाच्या आईला विचारणा केली. त्यानंतर त्याला यशवंतराव चव्हाण हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्याचा नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला. तो शनिवारी रात्री पॉझिटिव्ह आला.

त्यानंतर हॉस्पिटलमधील त्याच्यावर शस्त्रक्रिया करणारे सर्जन, डॉक्टर, निवासी डॉक्टर, परिचारिका असे 72 जण तसेच हॉस्पिटलमधील इतर 30 कर्मचारी यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्या सर्वांचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.