Pune Traffic | किरकटवाडी ते नांदेड रस्ता रूंदीकरणाच्या कामासाठी पुणे ते सिंहगड रस्त्यासाठी पर्यायी वाहतुक व्यवस्था; जाणून घ्या सविस्तर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Traffic | किरकटवाडी ते नांदेड रस्त्याचे (Kirkatwadi to Nanded Road) रूंदीकरण, सिमेंट बांधकाम व मजबुती करणाचे काम सुरू आहे. त्यामुळे सदरील रोडवर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे नागरिकांना वेळेवर कार्यालयात पोहचणे, रूग्णांना रूग्णवाहिकेतून दवाखान्यात घेऊन जाणे शक्य होत नाही. त्यामुळे किरकटवाडी ते नांदेड या ठिकाणाहून वाहतुक वळविण्यासाठी (Pune Traffic) जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Collector Dr. Rajesh Deshmukh) यांनी वाहतुकीत बदल केले आहेत.

 

किरकटवाडी ते नांदेड रस्ता रूंदीकरणाचे कामासाठी पुणे ते सिंहगड रस्त्यावरील (Pune to Sinhagad Road) वाहतुक पर्यायी रस्त्यावरून खालील प्रमाणे.

 

1. पुणे बाजुकडून खडकवासला (khadakwasla), सिंहगड (Sinhagad), पानशेत (panshet) बाजूकडे जाणारे नागरिकांनी नांदेड सिटी (Nanded City) मधुन नांदेड गाव (Nanded Gaon), शिवणे (Shivne) बाजूने उत्तमनगर मार्गे खडकवासला या मार्गाचा वापर करावा.

 

2. खडकवासला, सिंहगड, पानशेत बाजुकडून पुणे बाजूकडे जाणारे नागरिकांनी खडकवासला धरणाचे बाजूने उत्तमनगर पुढे वारजे किंवा शिवणे नंतर नांदेडगाव, नांदेड सिटी या मार्गाचा वापर करावा.

 

नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करून होणारी वाहतूक कोंडी (Pune Traffic Jam) टाळावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 

Web Title :- Pune Traffic | Alternative traffic on Pune to Sinhagad road for widening of Kirkatwadi to Nanded road; Learn more

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Maharashtra Gram Panchayat by-election | महाराष्ट्रातील 7 हजार ग्रामपंचायत सदस्यांच्या पोटनिवडणुकांसाठी तारखा जारी

Kanyaka Bank Chandrapur Recruitment 2021 | श्री कन्यका नागरी सहकारी बँकेत विविध पदांसाठी भरती, जाणून घ्या

Wifi Range Extender | आता यूजर्सला मिळेल वादळासारखा इंटरनेट स्पीड ! 1KM अंतरावरून सुद्धा होवू शकते WiFi ‘कनेक्ट’, झटपट होतील सर्व कामे