Pune Traffic Jam Problem | वाहतूक कोंडीवरून होणारी टीका दोन्ही आयुक्तांनी घेतली मनावर ! मनपा आयुक्त आणि पोलिस आयुक्तांनी रस्त्यांची संयुक्त पाहाणी करून सुचविल्या ‘ऑन द स्पॉट’ उपाययोजना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Traffic Jam Problem | प्रकल्पांच्या कामांच्या ठिकाणी होणार्‍या वाहतूक कोंडीचा आढावा घेउन त्यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने पुणे महापालिका आयुक्त आणि पोलिस आयुक्तांनी दोन्ही विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत आज शहरातील विविध मार्गांची पाहाणी करून ‘ऑन द स्पॉट’ काही सूचना केल्या. एवढेच नव्हे तर काम सुरू असल्याशिवाय कुठल्याही रस्त्यांवर बॅरीकेडींग करून रस्ते अडविणार्‍या संबधित ठेकेदार कंपन्यांविरोधात दंडात्मक कारवाईचे देखिल आदेश दोन्ही आयुक्तांनी यावेळी दिले. (Pune Traffic Jam Problem)

 

 

दरम्यान, महापालिका आयुक्त आणि पोलिस आयुक्त संयुक्तरित्या दौरा करणार असल्याने शहरातील बहुतांश गर्दीच्या रस्त्यांवर वाहतूक आणि पोलिस ठाण्यातील पोलिस तसेच महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची पथके दिसून आली. यंत्रणेच्या रस्त्यांवरील अस्तित्वामुळे दिवसभरात शहरातील बहुतांश रस्ते कोंडीमुक्त झाल्याचे पाहायला मिळाले. (Pune Traffic Jam Problem)

 

मागील काही महिन्यांपासून अर्थात पावसाळ्याच्या सुरूवातीपासून शहरातील बहुतांश रस्त्यांवर वाहतूक कोंडी दिसून येत होती. चोवीस तास पाणी पुरवठा योजना व अन्य सेवावाहीन्यांसाठीच्या खोदाईमुळे रस्ते खड्डेमय झाल्याने वाहतूक कोंडीत मोठी भर पडत होती. अशातच वाहतूक पोलिसांचे अस्तित्वच जाणवत नसल्याने ६० लाख पुणेकरांनी गणेशोत्सव, नवरात्र आणि दिवाळीदेखिल प्रचंड वाहतूक कोंडीमध्येच गेली. यावरून सर्वच स्तरातून टीका सुरू झाल्यानंतर पोलिस आणि महापालिका पालिका प्रशासनामध्ये एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याची स्पर्धा सुरू झाली होती.

 

पाउस थांबताच पालिका प्रशासनाने खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले. तसेच खड्डेमय रस्त्यांच्या नूतनीकरणासाठी निविदा प्रक्रिया देखिल राबविली. तसेच विविध संस्थांच्या माध्यमातून ८१५ ट्रॅफीक वॉर्डनही उपलब्ध करून दिले. तर वाहतूक पोलिसांमुळे होत असलेल्या आरोपांची पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (Pune CP Amitabh Gupta) यांनी गंभीर दखल घेत वाहतूक पोलिसांसोबतच पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचार्‍यांना जबाबदार धरत त्यांनाही वाहतूक नियंत्रणात गुंतवले. यापुढे जाउन आज गुप्ता यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar) यांच्यासोबत शहरात सुरू असलेल्या मोठ्या प्रकल्पांच्या ठिकाणी भेट देउन वस्तुस्थिती जाणून घेतली. त्यानुसार उपस्थित अधिकार्‍यांना उपाययोजनांबाबत सूचनाही दिल्या.

 

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (IPS Amitabh Gupta) यांनी सकाळी खराडी आणि जेल रोड परिसरातील रस्त्यांवर पाहाणी केली. यानंतर विक्रम कुमार यांच्यासोबत गणेश खिंड रस्त्यावरील गव्हर्नमेंट पॉलिटेक्नीक, पुणे विद्यापीठ चौक (Pune Vidyapeeth Chowk), बाणेर (Baner), चांदणी चौक (Chandani Chowk Pune), नवले पूल (Navle Bridge) आणि सिंहगड रस्ता (Sinhagad Road) परिसरात सुरू असलेली मेट्रो (Pune Metro), उड्डाणपुलांच्या कामाच्या ठिकाणची पाहाणी केली. गणेशखिंड रस्त्यावर (Ganesh Khind Road) दुमजली उड्डाणपुलासाठी पायलिंगचे काम सुरू होईस्तोवर विद्यापीठ चौकातून जवाहर चौकात यु टर्न घेउन सेनापती बापट रस्त्याकडे जाण्याचा रस्ता खुला करण्याची सूचना करण्यात आली. या सूचनेची तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी टाटा कंपनीने मेट्रोच्या कामगारांसाठीचा कंटेनर काढून घेउन रस्ता खुला करण्यात आला. याठिकाणी पायलिंगचे काम सुरू झाल्यानंतर हा रस्ता बंद करण्याचे आदेश देण्यात आले. सेनापती बापट (SB Road Pune) रस्त्याने मॉर्डन शाळेच्या मैदानातून पाषाणकडे जाणार्‍या रस्त्याचे काम पुढील आठवड्याभरात पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले.

बाणेर रस्त्यावर ज्या ठिकाणी मेट्रोने पिलर उभारणीचे काम पूर्ण केले आहे. परंतू अद्याप पुढील काम करण्यास अवधी आहे, तेथील बॅरीकेडस काढून रस्त्याची वहन क्षमता वाढविण्याची सूचना करण्यात आली. तसेच दोन महिन्यांहून अधिक काळ काम बंद असतानाही बॅरीकेडस् लावल्याचे आढळल्यास संबधित ठेकेदारांवर कारवाई करावी, असे आदेश स्थानीक पोलिसांना यावेळी देण्यात आले. चांदणी चौकातील कामही जून २०२३ अखेर पूर्ण करण्याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणच्या अधिकार्‍यांना आदेश देण्यात आले. अपघात प्रवण नवले पुलावर अपघात रोखण्यासाठी करण्यात आलेल्या प्राथमिक कामांची देखिल दोन्ही आयुक्तांनी पाहाणी केली.
याप्रसंगी महापालिकेचे मुख्य प्रकल्प अभियंता श्रीनिवास बोनाला (Srinivas Bonala),
पथ विभागाचे प्रमुख व्हि.जी. कुलकर्णी (PMC V.G. Kulkarni),
अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप (PMC Madhav Jagtap),
वाहतूक शाखेच्या प्रभारी भाग्यश्री नवटके (IPS Bhagyashree Navtake),
वाहतूक पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे (DCP Rahul Shrirame) यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली.

 

Web Title :- Pune Traffic Jam Problem | PMC Commissioner Vikram Kumar and
Pune Police Commissioner Amitabh Gupta took the criticism of the traffic jam to heart!
PMC Commissioner and Pune CP jointly inspect the roads and suggest ‘on the spot’ measures

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा