Pune Traffic News | लॉकडाउनचा अंदाज न आल्याने ‘अनलॉक’ नंतर शहराच्या मध्यवर्ती भागात वाहतुकीची ‘कोंडी’; पाणी पुरवठा, ड्रेनेज लाईनच्या ‘अनियोजित’ कामांचा वाहनचालकांना फटका

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहर ‘अनलॉक’ (Unlock) होत असताना मध्यवर्ती शहरात (Central city) मोठ्याप्रमाणावर खोदाई केल्याने शहराची ‘कोंडी’ झाली आहे. पावसाळ्याच्या तोंडावर १० जून पर्यंत खोदाई बंद करून रिईन्स्टीटमेंट करण्याची मुदत उलटूनही अद्याप कामे सुरूच असल्याने ‘फज्जा’ उडाला आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागातील बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, केळकर रस्त्यावर चोवीस तास पाणी पुरवठा आणि ड्रेनेज लाईनची (Drainage line) कामे सुरू आहेत.मध्यवर्ती शहरातील ड्रेनेज लाईन या ४५ वर्ष जुन्या असून अनेक ठिकाणी नादुरूस्त झाल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. यासाठी महापालिका (Municipal Corporation) आयुक्तांनी २०२०-२१ च्या अंदाजपत्रकामध्ये (Estimates) या कामासाठी तरतूद केली आहे. दरम्यान, दुसर्‍या लाटेतील लॉकडाऊनची (Lockdown) संधी साधून एकाचवेळी पाणी पुरवठा (Water supply) आणि ड्रेनेजलाईनची कामे सर्वच सुर करण्यात आली. लॉकडाऊनच्या (Lockdown) कालावधीत वाहतुकीवर (Transportation) निर्बंध असल्याने मोकळ्या रस्त्यांवर मोठ्याप्रमाणावर खोदाई करून कामे सुरू करण्यात आली.

 

नेहमीच्या पद्धतीने ही कामे न करता खोदाईनंतर राडारोडा त्याचठिकाणी टाकण्यात आला. एका रस्त्यावर काम करताना वाहनांसाठी पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्यात आली नाही. दरम्यानच्या काळात सातत्याने पाऊस (rain) पडल्याने सर्व रस्ते चिखलमय आणि खड्डेमय झाले. अनलॉक (Unlock) प्रक्रिया सुरू झाल्यानंतर वाहने गल्लीबोळातून व मिळेल त्या मार्गाने पुढे नेणे हा एकमेव पर्याय वाहनचालकांकडे राहीला आहे. अशातच गल्लीबोळातील पार्किंगमुळे अगोदरच अरुंद झालेल्या रस्त्यांवरून दोन्ही बाजूने वाहने ये जा करू लागल्याने होणार्‍या वाहतूक कोंडीतून (Traffic jam) पादचार्‍यांनाही जाणे मुश्किल झाले आहे.

अनलॉकनंतर (Unlock) मागील दहा दिवसांपासून रस्त्यावर मोठ्याप्रमाणावर वाहने येत असल्याने मध्यवर्ती शहरातच नव्हे तर अगदी नेहरू रस्ता आणि शास्त्री रस्त्यावरही अभूतपुर्व वाहतूक कोंडीचा (Traffic jam) सामना करावा लागत आहे. नोकरी व व्यवसायानिमित्त मध्यवर्ती भागातून जाणार्‍या उपनगरातील नागरिकांची (Citizen) विशेषत: वाहनचालकांची डोकेदुखी यामुळे वाढली आहे.

सभागृहनेते गणेश बिडकर (Leader of the House Ganesh Bidkar) यांनी आज यासंदर्भात वरिष्ठ अधिकार्‍यांची (Senior officers,) बैठक घेउन सूचना दिल्या.
यामध्ये ज्या मुख्य रस्त्यांची कामे अर्धवट आहेत.
तेथील वाहतूक (Transportation) वळवून चोवीस तास काम सुरू ठेवावे.
प्रत्येक कामासाठी स्वतंत्र अधिकारी व समन्वय करण्यासाठी वरिष्ठ अधिकार्‍याची नियुक्ती करून कामे गतीने पुर्ण करावीत.
सध्या सुरू असलेल्या कामांमुळे थोडा त्रास सहन करावा लागत असला तरी स्थानिक नागरिकांना पुढील काळात मोठा दिलासा मिळणार आहे.
असे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

READ ALSO THIS :

परमबीर सिंहांना सुप्रीम झटका ! महाराष्ट्राबाहेर चौकशीची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली, नेमकं काय म्हणालं SC हे जाणून घ्या

Maratha Reservation | 16 जूनपासून मराठा समाजाच्या मूक आंदोलनाला कोल्हापुरातून सुरुवात

 

Wab Title :- Pune Traffic News | Traffic jams in central city after ‘unlock’ due to unpredictable lockdown; Water supply, ‘unplanned’ works of drainage line hit motorists