पुणे : फुटपाथवर वाहने पार्क करणा-यांवर वाहतूक पोलिसांची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरामध्ये फुटपाथवर वाहने पार्क करणे आणि फुटपाथवरुन वाहने चालवणा-यांवर वाहतूक शाखेने कारवाई केली. विशेष मोहीमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. फुटपाथवर वाहने पार्क करणा-या १ हजार ६२० वाहनधारकांकडून २ लाख ८६ हजार चारशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर फुटपाथवर वाहन चालवणा-या ५६२ वाहनालकांवर कारवाई करुन १ लाख १३ हजार चारशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील अपघाताचे प्रमाण कमी करण्याकरीता आणि वाहतूक सुरळीत व सुरक्षीत चालण्या करीता वाहतूक शाखेकडून विशेष मोहीमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहीमेअंतर्गत पादचारी यांना फुटपाथवरुन सुरक्षीत चालण्याकरीता असताना देखील फुटपाथवर वाहने पार्क करण्यात येतात. तसेच फुटपाथवरुन वाहने चालवली जातात. अशा वाहनधारकांना जरब बसावी यासाठी विशेष मोहीमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. ही मोहीम २७ मे ते ७ जुन या दरम्यान राबविण्यात आली. तसेच ही मोहीम यापुढेही चालू राहणार असल्याचे वाहतूक शाखेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील फुटपाथ हे नागरीकांना पायी चालण्यासाठी आहेत. त्यावरुन वाहने चालवू नयेत तसेच वाहने पार्क करु नयेत असे आवाहन वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.