Pune Traffic Police | हिंजवडी- शिवाजीनगर मेट्रोच्या कामासाठी गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेत आजपासून बदल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Traffic Police | हिंजवडी- शिवाजीनगर मेट्रोच्या (Hinjewadi- Shivajinagar Metro) कामामुळे गणेश खिंड रस्त्यावरील (Ganeshkhind Road) वाहतुकीमध्ये उद्या अर्थात गुरूवारपासून बदल करण्यात येणार आहे. प्रामुख्याने विद्यापीठ चौकातून (SPPU Chowk) सुर्यमुखी दत्त मंदिर चौकातून मॉडेल कॉलनीकडे जाण्यासाठी थोरात चौकातून उजवीकडे वळण्यास अथवा यु टर्न घेण्यास बंदी करण्यात आली आहे. तसेच थोरात चौकाकडून येउन सुर्यमुखी दत्त मंदिर चौकातून उजवीकडे वळून विर चाफेकर चौकाकडे जाणार्‍या वाहनांना उजवीकडे वळण्यासही बंदी करण्यात आली आहे. (Pune Traffic Police)

याऐवजी रेंजहिल्स आणि विद्यापीठ चौकाकडून सुर्यमुखी दत्त मंदिर चौकातून थोरात चौकाकडे जाण्यासाठी वाहनचालकांनी वीर चाफेकर चौकातून अटल बिहारी वाजपेयी उड्डाणपुलाखालून यु टर्न घेउन सुर्यमुखी दत्त मंदिर चौकातून डावीकडे वळून थोरात चौक किंवा सरळ विद्यापीठ चौकाकडे जावे. थोरात चौकाकडून येउन सुर्यमुखी दत्त मंदिर चौकातून उजवीकडे वळणार्‍या वाहनांनी थोरात चौक, ललित महल चौक येथे डावीकडे वळून वीर चाफेकर चौकातून इच्छित स्थळी जावे, असे आवाहन वाहतूक पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे (DCP Rahul Shrirame) यांनी केले आहे.

 

Web Title :- Pune Traffic Police | Change in traffic system on Ganeshkhind road from today for work of Hinjewadi-Shivajinagar Metro

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nashik Crime | पहिल्या मजल्यावरुन पडल्याने 18 महिन्याच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

 

NCP Chief Sharad Pawar | धनुष्यबाण चिन्हाबाबत शरद पवारांचा शिंदेंना महत्त्वाचा सल्ला, म्हणाले…

 

MNS Leader Shalini Thackeray | ‘महिलांचे अस्तित्वच सरकारला अमान्य’ – मनसे नेत्या शालिनी ठाकरे