Pune Traffic Police | महामेट्रोच्या कामामुळे पर्णकुटी व Gold Adlabs Chowk येथील वाहतुकीत आजपासून बदल; वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Pune Traffic Police | वनाज ते रामवाडी मेट्रो मार्गावरील (Vanaz To Ramwadi Pune Metro Route) येरवडा येथील (Yerwada) पिलरवरील गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार असल्याने येरवडा परिसरातील वाहतुकीत (Yerwada Traffic Division) आजपासून पुढील दोन ते तीन महिन्यांसाठी बदल करण्यात आला आहे. वाहनचालकांनी या बदलांची नोंद घेउन पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी (Pune Traffic Police) केले आहे.

 

यामध्ये सिव्हील कोर्ट ते रामवाडी या मेट्रो रिच ३ मार्गीकेवरील एन.एम. चव्हाण चौक ते ऍडलॅब चौक (Gold Adlabs Chowk ) दरम्यान महामेट्रोच्या स्टेशनचे काम सुरू आहे. तसेच ऍडलॅब चौकामध्ये गर्डर टाकण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. यासाठी आजपासून २६ ऑगस्टपर्यंत येथील वाहतुक मार्गात बदल करण्यात आला आहे. बिशप स्कूलकडून एम.एन. चव्हाण चौकाकडे जाणारी वाहतूक गोल्ड ऍडलॅब चौकातून उजवीकडे वळून कल्याणीनगर (Kalyani Nagar) लेन नं. ३ येथून डावीकडे वळून एन.एम. चौकाकडे जाईल. ए.बी.सी. चौकाकडुन येणारी वाहतूक ऍडलॅब चौकातून सरळ रामवाडी अंडरपास याठिकाणी जाईल. (Pune Traffic Police)

याचवेळी पर्णकुटी चौकातही (Parnakuti Yerwada Chowk) मेट्रो मार्गीकेवर गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार आहे.
यामुळे आजपासून २७ जुलैपर्यंत सादलबाबा दर्गाहाकडून उजवीकडे पर्णकुटी चौकात वळून कोरेगाव पार्ककडे जाणारा मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे.
सादलबाबा चौकातून कोरेगाव पार्ककडे जाणार्‍या वाहनांनी सरळ गुंजन चौकात जावून यु टर्न घेउन पर्णकुटी चौकातून डाव्या बाजूने जावे,
असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे (DCP Rahul Shrirame)यांनी केले आहे.

 

Web Title :- Pune Traffic Police | Changes in traffic at Parnakuti Yerwada Chowk and Gold Adlabs Chowk from today due to work of Mahametro; Drivers should take alternative routes -Pune Traffic Police

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ajit Pawar | अविनाश भोसलेंच्या अटकेचं मला काय माहिती, आता काय सीबीआयला विचारायला जाऊ? अजित पवारांचा खोचक सवाल

 

Pune PMC Tax | पुणे महापालिका ! पहिल्या 57 दिवसांत पालिकेच्या मिळकत कर विभागाचे 751 कोटी 31 लाख रुपयांचे उत्पन्न

 

Avinash Bhosale Arrest Case | अविनाश भोसले अटक प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश; CBI नं मागितली होती 10 दिवसांची कोठडी