Pune Traffic Police | दिपोत्सवानिमित्त सारसबाग, स्वारगेट परिसरातील वाहतुकीत बदल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Traffic Police | पुण्यातील सारसबागेत (sarasbaug pune) शुक्रवारी (दि.5) पहाटे दीपोत्सव कार्यक्रमाचे (Dipotsav program) आयोजन करण्यात आले आहे. याठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार असल्याने या ठिकाणी वाहतूकीची कोंडी (Traffic jam) होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पुणे वाहतूक पोलिसांनी (Pune Traffic Police ) या परिसरातून होणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली (Divert) आहे. पहाटे 3 ते गर्दी ओसरेपर्यंत सारसबाग परिसरातील वाहतूकीत बदल कायम राहणार आहे. त्यामुळे वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे (DCP Rahul Shriram) यांनी केले आहे.

 

वाहतुकीतील बदल

सारसबाग ते पूरम चौक (Pooram Chowk) दरम्यानचा मार्ग वाहतुकीस पहाटे तीननंतर बंद करण्यात येणार आहे. गर्दी ओसरेपर्यंत सारसबाग परिसरातील वाहतूक बदल कायम राहणार आहे.

पर्यायी मार्ग – सावरकर चौकातुन सिंहगड रोड मार्गे दांडेकर पुल (Dandekar Bridge) मार्गे इच्छित स्थळी

पार्किंग व्यवस्था (Parking Arrangement)

सावरकर पुतळा ते सणस पुतळ्यापर्यंत वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे.

 

पार्किंग व्यवस्था पुढीलप्रमाणे-

पाटील प्लाझा – या ठिकाणी सिंगल पार्कीग करता येणार असून डबल पार्कींग करता येणार नाही.

– मित्रमंडळ कॉलनी परिसर आतील लेनमध्ये सर्कल पासून पुढे सिंगल पार्कींग

– पेशवे पार्क परिसर व अंतर्गत लेनमध्ये सिंगल पार्कींग

– सावरकर पुतळा ते पर्वती पायथा ब्रीज पर्यंत सिंगल पार्कींग (Pune Traffic Police)

 

Web Title :- Pune Traffic Police | Changes in traffic in Sarasbaug, Swargate area on the occasion of diwali 2021

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा