Pune Traffic Police | माघी गणेशोत्सव निमित्त शिवाजी रोडवरील वाहतूकीत बदल; जाणून घ्या पर्यायी मार्ग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Traffic Police |  येत्या शुक्रवारी (दि.4) माघी श्रीगणेश जयंती (Maghi Sriganesha Jayanti) असल्याने पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे (Shrimant Dagdusheth Halwai Ganpati) दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक येत असतात. यादरम्यान शिवाजी रोडवरील (Shivaji Road) वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली आहे. वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करुन इच्छित स्थळी जावे असे आवाहन पुणे वाहतूक शाखेचे (Pune Traffic Police) पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे (DCP Rahul Shrirame) यांनी केले आहे.

 

संभाव्य गर्दीच्या अनुषंगाने वाहतूकीची परिस्थिती पाहून आवश्यकतेप्रमाणे सर्व प्रकारच्या वाहनांना शुक्रवारी सकाळी सात पासून गर्दी संपेपर्यंत वाहतुकीस बंदी करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आपली गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा. (Pune Traffic Police)

 

पर्यायी मार्ग

1. शिवाजी रोड वरून स्वारगेटला (Swargate) जाणारे वाहन चालकांनी स.गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रोडने (Jangli Maharaj Road) खंडोजीबाबा चौक-टिळक चौक- टिळक रोडने (Tikal Road) इच्छित स्थळी जावे.

 

2. स.गो.बर्वे चौकातून पुणे मनपा भवनकडे (Pune Municipal Corporation Bhavan) जाणारे वाहन चालकांनी स.गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रोडने झाशी राणी चौक डावीकडे वळून इच्छितस्थळी जावे

 

3. अप्पा बळवंत चौकातून (Appa Balwant Chowk) बुधवार चौकाकडे जाणारी वाहतुक बंद करुन वाहतुक बाजीराव रोडने सरळ पुढे इच्छितस्थळी जाईल.

 

 

Web Title :-  Pune Traffic Police | Changes in traffic on Shivaji Road on the occasion of Maghi Sriganesha Jayanti; Learn alternative ways

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Mumbai Crime | संतापजनक! महिलेकडे पाहून तरुणाचे अश्लील चाळे, गुप्तांगही दाखवलं; प्रचंड खळबळ

 

Zeal Education Society | झील शिक्षण संस्थेच्या संभाजी काटकर, चंद्रकांत कुलकर्णी, युवराज भंडारी यांना पोलीस कोठडी

 

Pune Corporation | ‘रिन’ काढून ‘सण’; महापालिका दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर ! मोठ्या योजनांचा भार भविष्यात पुणेकरांच्या ‘खिशा’वर