पुणे वाहतूक पोलिसांचा गचाळ कारभार ; नियम मोडला एकाने दंड केला एकाला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरात हेल्मेट न घालणाऱ्या वाहन चलाकांवर कारवाईचा बडगा उचलण्यात येत आहे. मात्र कारवाई करताना पोलिसांची दंड आकारण्याची अती घाई ही एखाद्या निरपराध वाहन चालकाची डोकेदुखी ठरत आहे. असाच प्रकार पुण्यात घटला असून पोलिसांच्या गचाळ कारभाराचा फटका एका वाहन चालकाला बसला आहे. वाहतूकीचा नियम मोडणाऱ्या एका वाहनचालकाचा दंड मात्र दुसऱ्यालाच आकारण्यात आला.

पुणे शहरात पोलिसांकडून सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून वाहतूकीचे नियम मोडणाऱ्यावर देखरेख ठेवून त्यांच्यावर ई-चलनच्याद्वारे दंडाची कारवाई करण्यात येते. एखाद्या वाहन चालकाने नियम मोडल्यास सीसीटीव्हीच्या आधारे वाहनाच्या नंबरवरून दंड आकारला जातो. ज्या कोणी नियम मोडला आहे त्याला दंड भरावा लागतो. मात्र ज्यांनी गुन्हाच केला नाही अशांना देखील दंड भरावा लागत असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

पुण्यातमध्ये वाहतूक शाखेने MH12 NS 6151 या गाडीमालकावर हेल्मेट कारवईचा गुन्हा दाखल करून दंड ठोठावला. मात्र, पोलिसांकडून देण्यात आलेल्या पुराव्यात MH12 NS 1651 या क्रमांकाच्या वाहन चालकाने वाहतूक नियम मोडल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी दिलेल्या दंडाच्या चलनामध्ये MH12 NS 1651 या वाहन चालकाला दंड करण्याऐवजी MH12 NS 6151 या गाडीच्या मालकावर दंड पडलेला दिसत आहे. या गाडी मालकाला ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

आरोग्य विषयक वृत्त-
#YogyaDay 2019 : ‘सौंदर्य’ आणि ‘तारुण्य’ वाढविणारे नटराजन आसन
“ऍसिडिटीने” त्रस्त असणाऱ्यांसाठी रामबाण उपाय
” टाच ” दुखीमुळे त्रस्त असाल तर, जाणून घ्या टाच दुखीची कारणे आणि उपाय