वाहतुक पोलिसांची ‘वसूली’ मोहिम जोरात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –वर्दळीच्या वेळी दिवसा तर जॅमर कारवाई केली जातेच. परंतु स्थानिक रहिवाशांच्या रात्री पार्क केलेल्या चारचाकी आणि दुचाकी वाहनांना वाहतुक पोलिसांनी रात्री बारानंतरही मध्यरात्रीही जॅमर लावून कारवाई केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे तेथील स्थानिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

वसूली

शहरात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यासोबतच शहरात वाहने पार्क करण्यासाठी जागेच्या अभावी असल्याने रस्त्यावर वाहने पार्क केली जातात. वाहतुकीला अडथळा होऊ नये म्हणून शहरात नो पार्किंग झोनही तयार करण्यात आले आहेत. शहरात मध्यवस्तीमध्ये वाहने पार्क करण्याची मोठी समस्या आहे. लक्ष्मी रस्ता, मध्यस्तीतील पेठा या नेहमी खरेदीसाठी गजबलेल्या असतात. त्यावेळी वाहनांच्या पार्किंगची मोठी समस्या निर्माण होते. त्यामुळे नागरिक काही वेळा रस्त्यांवरच वाहने पार्क करतात. त्यामुळे त्यांचा वाहतुकीला अडथळा होतो. अशा वेळी शहरातील वाहतुक पोलिसांकडून नो पार्किंगमध्ये वाहने पार्क केल्याने जॅमर लावून कारवाई केली जाते. शहरातील जंगली महाराज रस्ता, फर्ग्यूसन कॉलेज रस्ता, मध्यवस्तीतील पेठांमधील रस्ते, लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, इत्यादी ठिकाणी जॅमर लावून दंड आकारणी केली जाते. दिवसा ही कारवाई वर्दळीच्या वेळी केली जाते. आणि दंडाची वसूली केली जाते.

परंतु लक्ष्मी रस्त्यावर परिसरात राहणार्‍या नागरिकांना त्यांची वाहने पार्क करण्यासाठी जागा नसल्याने त्यांनी लक्ष्मी रस्ता परिसरात वाहने पार्क केली होती. ३ मार्च रोजी रात्री बाराच्या सुमारास पोलिसांनी या वाहनांना जॅमर लावले. दिवसभराची कारवाई ठिक आहे. परंतु रात्री बारा वाजता पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.