Pune Traffic Police | पुणेकरांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका, पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी घेतला मोठा निर्णय

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Traffic Police |  पुण्यातील वाहतूक कोंडी (Traffic Jams) नित्याचीच झाली आहे. वाहतूक कोंडीतून पुणेकरांची सुटका करण्यासाठी पुणे पोलिसांकडून (Pune Police) वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी प्राधान्य देण्यात आले आहे. त्यानुसार ज्या ठिकाणी जास्त वर्दळ आहे अशा ठिकाणी वाहतूक नियमनासाठी वाहतूक कर्मचाऱ्यांना (Pune Traffic Police) तीन शिफ्टमध्ये ड्युटीला (Duty in 3 Shifts) हजर रहावे लागणार आहे. संबंधित वाहतूक कर्मचाऱ्यांना रात्रपाळी Night Duty (रात्री दोन पर्यंत) करावी लागणार आहे. यासंदर्भात वाहतूक विभागाने (Traffic Branch) नियोजन केले असून वाहतूक नियमनाच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Pune CP Amitabh Gupta) यांनी दिली आहे.

 

पुणे शहरातील (Pune City) वाढती वाहनांची संख्या, अरुंद रस्ते, विकासकामांसाठी करण्यात येणारे खोदकाम आणि कुचकामी प्रवाशी वाहतूक यंत्रणेमुळे वाहतूक कोडींमध्ये अधिकच भर पडते. गर्दीच्या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी कायमस्वरुपी सोडवण्यासाठी पुणे पोलिसांकडून (Pune Traffic Police) प्रयत्न केले जात आहेत. त्यानुसार आता जंगली महाराज रोड (Jangli Maharaj Road), स्वारगेट (Swargate), मार्केटयार्ड (Market Yard), बाणेर (Baner), चतु:श्रृंगी (Chaturshringi), कोरेगाव पार्क (Koregaon Park), हडपसर (Hadapsar), कोथरुड (Kothrud) परिसरात वाहतूक कर्मचाऱ्यांना रात्रपाळी करावी लागणार आहे.

 

एरवी बहुतांश चौकामध्ये रात्री दहा नंतर वाहनांची वर्दळ कमी असल्याने मॅन्युअल सिग्नल यंत्रणा कार्यान्वित (Manual Signal System) होते.
परंतु स्वारगेट, जंगली महाराज रस्ता, चतु:श्रृंगी, कोरेगाव पार्क यासह वर्दळीच्या काही ठिकाणी रात्री एक पर्यंत सिग्नल सुरु असल्याचे दिसून आले होते.
यामुळे संबंधित ठिकाणी कर्मचाऱ्यांना तीन शिफ्टमध्ये काम करुन वाहतूक नियमनाला गती द्यावी लागणार आहे.

पुणे शहरात शाळा, महाविद्यालयासह विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. तसेच नोकरदार तरुण – तरुणींची संख्या देखील अधिक प्रमाणात आहे.
त्यांच्याकडून दर शनिवार आणि रविवारी पार्ट्यांचे आयोजन करण्यात येते. खासकरुन मुंढवा, कोरेगाव पार्क, बाणेर, मध्यवर्ती ठिकाणांवर रात्री दोन वाजेपर्यंत वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून आले.
त्यामुळे अनेकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. याच पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांना कारवाई ऐवजी वाहतूक नियमन करावे लागणार आहे.
हद्दीतील वाहतूक कोंडी सोडवून पोलीस कर्मचाऱ्यांनी वाहन चालकांना दिलासा देण्याचे काम करावे अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
त्यामुळे ऐन पावसाळ्यात पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.

 

शहरामध्ये रात्रीच्या वेळी होणाऱ्या वाहतूक कोंडीचा त्रास कमी करण्यासाठी वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी तीन शिफ्टमध्ये काम करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.
त्यानुसार वाहतूक विभागाने कामाचे नियोजन  केले असून रात्रपाळी वाहतूक नियमन सुरु झाले आहे.
त्यामुळे वाहनचालकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे, असे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.

 

Web Title :- Pune Traffic Police | Pune traffic police also on duty in 3 shifts says cp amitabh gupta pune police news

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा