Pune Traffic Update | भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पुणे स्टेशन, आरोरा टॉवर्स, विश्रांतवाडी आणि दांडेकर पुल परिसरातील वाहतुकीत बदल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Traffic Update | भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Bharatratna Dr Babasaheb Ambedkar) यांच्या जयंतीनिमित्त (Dr Babasaheb Ambedkar Jayanti 2023) 14 एप्रिलला पुणे स्टेशन (Pune Railway Station), आरोरा टॉवर्स (Arora Tower), विश्रांतवाडी (Vishrantwadi) आणि सिंहगड रोड जंक्शन Sinhagad Road Junction (दांडेकर पुल-Dandekar Pool) परिसरातील वाहतुकीमध्ये बदल (Pune Traffic Police) करण्यात आला आहे. 14 एप्रिलला वाहनचालकांनी (Pune Traffic Update) पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर (DCP Vijayakumar Magar) यांनी केले आहे.

 

डॉ. आंबेडकर जयंती निमित्त डॉ. आंबेडकर यांच्या पुतळयाला अभिवादन करण्यासाठी नागरिक मिरवणुकीने येत असतात. या कालावधीत रस्त्यांवर अबालवृद्धांची मोठ्याप्रमाणावर गर्दी असल्याने पुतळ्यांच्या परिसरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात येणार आहे. या कालावधीत केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहनाशिवाय (फायरब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका) परिसरातील वाहतूकीत आवश्यकतेनुसार तात्पुरत्या स्वरुपात बदल करण्यात येणार आहे.(Pune Traffic Update)

 

जिल्हाधिकारी कार्यालय परिसर
मंगळवार पेठेतील शाहीर अमर शेख चौकाकडून मालधक्का चौक आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारा मार्ग बंद ठेवण्यात येणार असून वाहनचालकांनी आरटीओ चौकातून जहांगीर हॉस्पीटलच्या दिशेने जाणार्‍या मार्गाचा वापर करावा. जीपीओ चौकातून बोल्हाई चौकाकडे जाण्याचा मार्ग बंद ठेवण्यात येणार असून वाहनचालकांनी किराड चौकातून नेहरू मेमोरियल मार्गे जावे. नरपतगिरी चौकाकडून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली असून वाहनचालकांनी कमला नेहरू हॉस्पिटल, पवळे चौक, कुंभार वेस चौकातून इच्छित स्थळी जावे. बॅनर्जी चौकाकडून शाहीर अमर शेख चौकाकडे जाण्याचा मार्ग बंद ठेवण्यात येणार असून वाहनचालकांनी कुंभार वेस चौकातून इच्छित स्थळी जावे.

वाहतुकीतील हा बदल गुरुवारी (दि.13) सकाळी सहा ते गर्दी संपेपर्यंत तात्पुरता अंमलात राहणार आहे.

पार्किंग व्यवस्था
वाहनचालकांनी आपली वाहने आर.टी.ओ. शेजारी एस.एस.पी.एम.एस. मैदान (दुचाकी व चारचाकी वाहने). पुणे स्टेशन येथील तुकाराम शिंदे वाहनतळ (दुचाकी व चारचाकी), ससून कॉलनी (दुचाकी वाहने) अशी पार्किंगची व्यवस्था केली आहे.

 

अरोरा टॉवर परिसर
आरोरा टॉवर्स येथील कोयाजी रस्त्यावरून पुणे स्टेशनकडे जाणारी वाहतूक तीन तोफा चौक येथे बंद ठेवण्यात येणार असून एसबीआय हाउस चौकाकडे वळविण्यात येणार आहे. इस्कॉन मंदिराकडून अरोरा टॉवर्सकडे जाण्यास बंदी राहील. तसेच नेहरू चौकाकाडून तीन तोफा चौकाकडे जाणारी वाहतूक बंद केली आहे. वाहनचालकांनी एस.बी.आय. हाऊस मार्गाचा वापर करावा. तर महात्मा गांधी रोडकडून अरोरा टॉवरकडे जाणारा मार्ग वाहतूकीसांठी बंद राहणार असून वाहनचालकांनी बाटलीवाला बगीचा मार्गे इच्छित स्थळी जावे.

 

पार्किंग व्यवस्था
वाहन चालकांनी आपली वाहने तारापोर रोड, ईस्ट स्ट्रीट व अन्य रस्त्यांवरील पे-अॅण्ड पार्कच्या ठिकाणी पार्क करावीत.
अरोरा टॉवर परिसरातील वाहतूक व्यवस्थेतील बदल शुक्रवारी (दि.14) सकाळी 6 पासून गर्दी संपेपर्यंत असणार आहेत.
मिरवणूक मार्गांवरील वाहतूक आवश्यकतेनुसार, टप्प्या-टप्प्याने बंद किंवा पर्यायी मार्गाने वळवली जाणार आहे.

विश्रांतवाडी परिसर
एअरपोर्ट, टिंगरेनगरकडे जाणार्‍या वाहनांनी शादलबाबा चौक-चंद्रमा चौक- आळंदी
जंक्शन-आंबेडकर चौक-गोल्फ क्लब चौक-येरवडा पोस्ट ऑफिस चौक-509 चौक मार्गे जावे.

 

कळस, म्हस्केवस्ती, बोपखेल, दिघी, आळंदीकडून पुण्याकडे येणाऱ्या वाहनांनी कळस फाटा
येथून टँक रोडने उजवीकडे वळून चव्हाण चाळीतून डावीकडे वळून सरळ पर्यायी कच्चा मार्गाने शांतीनगर
येथून टँक रोडने खडकी किंवा डावीकडे वळून मेंटल कॉर्नर मार्गे इच्छित स्थळी जावे.

 

विश्रांतवाडी परिसरातील वाहतूक व्यवस्थेतील बदल शुक्रवार (दि.14) दुपारी तीन पासून गर्दी संपेपर्यंत असणार आहेत.

 

सिंहगड रोड जंक्शन
सिंहगड रोड जंक्शन (दांडेकर पूल) परिसरातील वाहतूक व्यवस्थेत गुरुवारी (दि.13) रात्री आठ पासून गर्दी संपेपर्यंत आवश्यकतेनुसार बदल केले
जाणार आहेत. या ठिकाणाहून मिरवणुका निघणार असून मिरवणूक मार्गावरील वाहतूक
आवश्यकतेनुसार टप्प्या टप्प्याने बंद किंवा पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे.
असे विजयकुमार मगर यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

 

Web Title :- Pune Traffic Update | Traffic changes in Pune railway station, Arora Towers, Vishrantwadi and dandekar pool areas on the occasion of Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2023

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sanjay Dutt Injured | शुटिंग दरम्यान जखमी झाल्याने संजय दत्त रूग्णालयात दाखल

Dr. Baba Adhav | डॉ. बाबा आढाव यांना महाराष्ट्र भूषण देण्याची शिवसेनेची (UBT) मागणी

Pune Crime News | अनैतिक संबंधाच्या संशयावरून प्रेयसी व तिच्या 2 लहान मुलांचा खून करणार्‍याला कोंढवा पोलिसांकडून अटक