
Pune Traffic Updates | सिंहगड व भारती विद्यापीठ वाहतूक विभागाअंतर्गत पार्किंग व्यवस्थेत बदल
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Traffic Updates | सिंहगड वाहतूक विभागाच्या (Sinhagad Road Traffic Division) हद्दीत वडगाव ते पाउंजाई माता मंदीर रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकापासून विष्णू पुरम सोसायटीच्या प्रवेशद्वाराकडे जाणाऱ्या दोन्ही बाजुला ५० मीटर पर्यंत नो-पार्किंग (No Parking) करण्यात येत असल्याचे तात्पुरते आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. तसेच भारती विद्यापीठ वाहतूक विभागाच्या (Bharti Vidyapeeth Traffic Division) हद्दीत भारती विद्यापीठ मुख्यद्वार ते भारती रुग्णालयाचे प्रवेशद्वार दरम्यान उत्तर-दक्षिण अंतर २०० फूट व रुंदी ३० फुट या सेवा मार्गावर नो-पार्किंग करण्यात येत असल्याचे अंतिम आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. (Pune Traffic Updates)
अग्नीशमन वाहने, पोलीस वाहने, रुग्णवाहिका आदी अत्यावश्यक सेवेतील वाहनांना हे आदेश लागू नसतील. सिहंगड वाहतूक विभागांतर्गत पार्किंग व्यवस्थेबाबतच्या तात्पुरत्या आदेशाबाबत नागरिकांना सूचना द्यावयाच्या असल्यास पोलीस उपआयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, बंगला क्रमांक ६, येरवडा टपाल कचेरीजवळ, पुणे-४११००६ येथे २१ जून पर्यंत लेखी स्वरुपात कळवाव्यात, असे पुणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपआयुक्त विजयकुमार मगर (DCP Vijaykumar Magar) यांनी कळविले आहे. (Pune Traffic Updates)
Web Title : Pune Traffic Updates | Changes in parking arrangement under Sinhagad and Bharti Vidyapeeth Traffic Divisions
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- Maharashtra Revenue Department | महसूल विभाग : चिमूर, शिर्डी येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालये
- Disabled Welfare Department Maharashtra | दिव्यांग कल्याण विभाग : मानसिक आजारमुक्त व्यक्तींकरिता नागपुर, पुणे, ठाणे व रत्नागिरी जिल्ह्यात 16 पुनर्वसनगृह होणार
- Maharashtra Department of Animal Husbandry And Dairying | पशुसंवर्धन विभाग : लातूर येथे पशुरोग निदान प्रयोगशाळा