Pune Traffic Updates News | शिवाजीनगर बस स्थानकाला लागून असलेला आकाशवाणी चौक ते दळवी हॉस्पिटल चौक रस्ता वाहतुकीसाठी खुला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Traffic Updates News | पुणे मेट्रोचे (Pune Metro) बांधकाम करताना सुरक्षिततेच्या दृष्टीने बॅरिकेट टाकून काही रस्ते बंद करण्यात आले होते. बॅरिकेट मुळे वाहतुकीला अडथळा (Pune Traffic Updates News) होत असल्याने काम संपेल तसे बॅरिकेट काढून रस्ता मोकळा करण्याचे धोरण मेट्रोने सुरुवातीपासून अवलंबले आहे. शिवाजीनगर बस स्थानकाला (Shivaji Nagar ST Stand) लागून असलेल्या मातोश्री रमाबाई आंबेडकर चौक (आकाशवाणी चौक-Akashvani Chowk) ते दळवी हॉस्पिटल हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

 

फुगेवाडी मेट्रो स्थानक ते सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्थानक तसेच गरवारे कॉलेज मेट्रो स्थानक (Garware College Metro Station) ते सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्थानक (Civil Court Interchange Metro Station) आणि सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्थानक ते रूबी हॉल मेट्रो स्थानक (Ruby Hall Metro Station) या मार्गांचे 95 टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या मार्गावरील (Pune Traffic Updates News) बॅरिकेट काढून रस्त्यांची रुंदी पूर्ववत करण्यात आली आहे.

 

शिवाजीनगर बस स्थानकाला लागून असलेल्या मातोश्री रमाबाई आंबेडकर चौक (आकाशवाणी चौक) ते
दळवी हॉस्पिटल हा रस्ता शिवाजीनगर भूमिगत मेट्रो स्थानकाच्या बांधकामासाठी बंद करण्यात आला होता.
शिवाजीनगर भूमिगत मेट्रो स्थानकाचे बांधकाम जवळपास पूर्ण होत आले आहे.
त्यामुळे मातोश्री रमाबाई आांबेडकर चौक (आकाशवाणी चौक) ते दळवी हॉस्पिटल
या रस्त्याचे नावीन काँक्रीटीकरण करून हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
ह्या रस्त्याची लांबी 174 मीटर आहे. त्यामुळे या भागातील वाहतूक नियमित सुरु झाली आहे.

 

Web Title :- Pune Traffic Updates News | Akashvani Chowk to Dalvi Hospital Chowk road adjacent to Shivajinagar Bus Station is open for traffic

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Jalgaon ACB Trap | 25 हजाराच्या लाच प्रकरणी नायब तहसिलदारासह कोतवाल अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

Maharashtra Political Crisis | 9 महिन्यानंतर सत्तासंघर्षाची सुनावणी पूर्ण, निकाल कधी?

Pune Crime News | दोषारोपपत्र दाखल करण्यापूर्वीच खुनातील आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर