पुणे रेल्वे स्थानकातून जाता येणार थेट मेट्रोच्या स्थानकात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

रेल्वे स्थानकात उतरलेल्या प्रवाशाला शहरांतर्गत प्रवासासाठी थेट मेट्रो स्थानकात जाता येईल, अशा पद्धतीचे नियोजन सध्या करण्यात येत आहे. पुणे स्थानकात नव्याने उभारण्यात आलेल्या पादचारी पुलाची बांधणीही मेट्रो स्थानकाचा विचार करून करण्यात आली आहे. जेणे करून पुणे रेल्वे स्थानकात उतरलेल्या प्रवाशांना शहरांतर्गत प्रवासासाठी मेट्रो स्थानकात जाता येणार आहे, अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

[amazon_link asins=’B0748NPV86,B0757K3MSX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2635c152-aff7-11e8-89a6-41b51a447723′]

पुणे रेल्वे स्थानकाच्या मागील बाजूस असणाऱ्या राजा बहाद्दूर मिल रस्त्यावरून मेट्रो जाणार आहे. या रस्त्यावर रेल्वे  स्थानकाजवळच मेट्रोचेही स्थानक उभारण्यात येणार आहे. पुणे रेल्वे स्थानकावर यापूर्वी सर्व स्थानकाला जोडणारा एकच पादचारी पूल होता. हा पूल सुमारे ९० वर्षांचा झाल्याने, त्याचप्रमाणे स्थानकात येणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता सुमारे दोन वर्षांपूर्वी नव्या पुलाच्या बांधणीचे नियोजन करण्यात आले होते. पुलाच्या सुरुवातीच्या आराखड्यात तो मेट्रो स्थानकाला जोडण्याचे नियोजन नव्हते. मात्र, मेट्रोच्या मार्गाची आखणी झाल्यानंतर हे नियोजन करण्यात आले.

देशभरात ३ महिन्यात पावसाचे १४०० पेक्षा जास्त बळी

पुणे स्थानकावरील मेट्रोचा नवा पूल भविष्यात रेल्वेचे वाढते प्रवासी आणि मेट्रोच्या प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन उभारण्यात आला आहे. त्यामुळेच त्याची रुंदी तब्बल १२ मीटर ठेवण्यात आली आहे. त्यामुळे एकाच वेळेला मोठ्या संख्येने प्रवाशांचा भार वाहण्याची क्षमता या पुलामध्ये आहे. मेट्रो आणि रेल्वे स्थानक एकमेकांना जोडल्यामुळे प्रवाशांना सुविधा उपलब्ध होण्याबरोबरच रस्त्यावर वाहतुकीचा ताणही कमी होऊ शकणार आहे. पुणे रेल्वे स्थानकाबरोबरच शिवाजीनगर रेल्वे स्थानकाजवळील मेट्रो स्थानकही रेल्वे स्थानकाला जोडण्याचे नियोजन केले आहे. पुणे रेल्वे स्थानकाच्या मुख्य इमारतीजवळच्या दत्त मंदिरापासून सुरू होणारा हा नवा पादचारी पूल स्थानकातील सहाही फलाटांना जोडून राजा बहाद्दूर मिल रस्त्यालगतच्या रेल्वे विभागीय कार्यालयाजवळ उतरतो. याच भागामध्ये मेट्रोच्या स्थानकाचे नियोजन आहे. भविष्यात हा पूल मेट्रोच्या स्थानकाला जोडण्यात येणार आहे. त्यामुळे बाहेरगावाहून एखादा प्रवासी रेल्वेने आल्यास त्याला स्थानकाबाहेर न जाताच पादचारी पुलावरून जात शहरांतर्गत प्रवासासाठी मेट्रोच्या स्थानकावर जाता येईल.