Pune Trains Cancelled | मुसळधार पावसामुळे पुणे- अहमदाबाद, वास्को-हजरत निजामुद्दीन, मुंबई-हैदराबाद ‘या’ एक्सप्रेससह 14 विशेष गाड्या रद्द

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Pune Trains Cancelled | मागील काही दिवसांपासून कोकण (Konkan) व पश्चिम महाराष्ट्रात (Western Maharashtra) बरसणाऱ्या मुसळधार पावसामुळे (Heavy rain) जनजीवन विस्कळीत झाले आहे. रेल्वे व रस्ते वाहतुकीला पावसाचा मोठा फटका बसला आहे. अनेक रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलले आहेत तर काही रेल्वे गाड्या रद्द (Pune Trains Cancelled) करण्यात आल्या आहेत. सतत पडणाऱ्या पावसामुळे आणि लोहमार्गावर पडणाऱ्या दरडी, जमीन खचणे या कारणामुळे रेल्वे प्रशासनाने 14 विशेष गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोल्हापूर-मिरज, कर्जत-लोणावळा यासह इतर विभागामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे.
मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे प्रशासने 14 रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

रद्द करण्यात आलेल्या गाड्या


1.
गाडी क्रमांक 02298 पुणे- अहमदाबाद (Pune-Ahmedabad Express) विशेष एक्सप्रेस गाडी 24 आणि 26 जुलै तसेच मंगळवार आणि रविवारी चालणारी विशेष गाडी 02297 25 आणि 27 जुलैरोजी रद्द करण्यात आली आहे.

2. विशेष गाडी क्रमांक 01007/01008 पुणे-मुंबई-पुणे एक्सप्रेस (Pune-Mumbai-Pune Express) एक्सप्रेस 24 ते 27 जुलैपर्यंत रद्द करण्यात आली आहे.

3. विशेष गाडी क्रमांक 02015/02016 पुणे-मुंबई-पुणे एक्सप्रेस 24 ते 27 जुलै दरम्यान रद्द करण्यात आली आहे.

4. विशेष गाडी क्रमांक 01029 मुंबई-कोल्हापूर एक्सप्रेस (Mumbai-Kolhapur Express) एक्सप्रेस 24 ते 28 जुलै पर्यंत आणि विशेष गाडी क्रमांक 01030 कोल्हापुर-मुंबई एक्सप्रेस 24 ते 27 जुलै दरम्यान रद्द करण्यात आली आहे.

5. विशेष गाडी क्रमांक 01411 मुंबई-कोल्हापूर एक्सप्रेस 24 ते 28 जुलै पर्यंत आणि विशेष गाडी क्रमांक 01412 कोल्हापुर-मुंबई एक्सप्रेस 24 ते 27 जुलै दरम्यान रद्द करण्यात आली आहे.

6. विशेष गाडी क्रमांक 07613 पनवेल-नांदेड एक्सप्रेस (Panvel-Nanded Express) 25 ते 28 जुलै पर्यंत आणि विशेष गाडी क्रमांक 07614 नांदेड-पनवेल एक्सप्रेस 24 ते 27 जुलै पर्यंत रद्द करण्यात आली आहे.

7. विशेष गाडी क्रमांक 02702 हैदराबाद-मुंबई एक्सप्रेस (Hyderabad-Mumbai Express) 24 ते 27 जुलैपर्यंत रद्द करण्यात आली आहे.

8. विशेष गाडी क्रमांक 07031 मुंबई- हैदराबाद 25 ते 28 जुलैपर्यंत रद्द करण्यात आली आहे.

9. प्रत्येक सोमवार, शुक्रवार आणि रविवारी चालणारी विशेष गाडी क्रमांक 01027 दादर-पंढरपूर एक्सप्रेस (Dadar-Pandharpur Express) 25 आणि 26 जुलै आणि सोमवार, मंगळवार आणि शनिवारी चालणारी 01028 पंढरपूर-दादर एक्सप्रेस 26 व 27 जुलै रोजी रद्द करण्यात आली आहे.

10. विशेष गाडी क्रमांक 01139 मुंबई-गदग एक्सप्रेस (Mumbai-Gadag Express) 24 ते 27 जुलै आणि विशेष गाडी क्रमांक 01140 गदग- मुंबई एक्सप्रेस 25 ते 28 जुलै पर्यंत रद्द करण्यात आली आहे.

11. प्रत्येक बुधवार, शुक्रवार आणि शनिवारी चालणारी विशेष गाडी क्रमांक 02043 मुंबई-बिदर एक्सप्रेस (Mumbai-Bidar Express) 24 जुलै रोजी आणि प्रत्येक गुरुवार, शनिवार आणि रविवारी चालणारी विशेष गाडी क्रमांक 02044 बिदर-मुंबई एक्सप्रेस 25 जुलै रोजी रद्द करण्यात आली आहे.

12. प्रत्येक मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शनिवारी चालणारी विशेष गाडी क्रमांक 01041 दादर-साईनगर शिर्डी एक्सप्रेस (Dadar-Sainagar Shirdi Express) 24 ते 27 जुलै आणि प्रत्येक बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि रविवारी चालणारी विशेष रेल्वे गाडी क्रमांक 01042 साईनगर शिर्डी-दादर एक्सप्रेस 25 ते 28 जुलै पर्यंत रद्द करण्यात आली आहे.

13. प्रत्येक मंगळवार आणि शुक्रवारी चालणारी विशेष गाडी क्रमांक 02235
सिकंदराबाद-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस (Secunderabad-Lokmanya Tilak Terminus Express)
27 जुलै रोजी आणि प्रत्येक बुधवार आणि शनिवारी चालणारी विशेष रेल्वे गाडी क्रमांक 02256
लोकमान्य टिळक टर्मिनस-सिकंदराबाद एक्सप्रेस 28 जुलै रोजी रद्द करण्यात आली आहे.

14. विशेष गाडी क्रमांक 02779 वास्को-हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस (Vasco-Hazrat Nizamuddin Express)
23 जुलै आणि गाडी क्रमांक 02780 हजरत निजामुद्दीन-वास्को एक्सप्रेस 25 जुलै रोजी रद्द करण्यात आली आहे.

Web Title :- Pune Trains Cancelled | 14 trains with pune ahmedabad mumbai hyderabad vasco hazrat nizamuddin express canceled due to rain

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Rain | पुण्याच्या रास्ता पेठेतील केईएम हॉस्पीटलसमोर भरपावसात रिक्षावर झाड कोसळलं; चालकासह महिला जखमी (व्हिडीओ)

Pune Crime | पुण्यातील सायकलचोर ‘आशिक’ पोलिसांच्या जाळ्यात, कोरोनाकाळात केले ‘हे’ उद्योग, जाणून घ्या प्रकरण

Modi Government Schemes | मोदी सरकारच्या ‘या’ 12 योजना, ज्यांच्याद्वारे कर्जापासून उपचारापर्यंत मिळतेय लाखो रुपयांची मदत, जाणून घ्या