Pune : पोलीस आयुक्तालयातील 21 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहर पोलीस दलातील 21 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. अप्पर पोलीस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर यांनी आज बदल्यांचे आदेश दिले आहेत. राज्यातील पोलीस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्यानंतर अंतर्गत बदल्या केल्या जात आहेत.

पोलीस निरीक्षक बदली…
यशवंत गवारी (पिंपरी चिंचवड ते वरिष्ठ निरीक्षक बंडगार्डन), राजेंद्र लांडगे (सीआयडी ते वरिष्ठ निरीक्षक फरासखाना पोलीस ठाणे), विक्रम गौड (नागपूर ते पोलीस निरीक्षक गुन्हे शिवाजीनगर पोलीस ठाणे), बालाजी पांढरे (ठाणे ग्रामीण ते गुन्हे शाखा), सुनील माने (ठाणे ग्रामीण ते विशेष शाखा), सुनील जाधव (सोलापूर शहर ते अप्पर पोलीस आयुक्त वाचक, पश्चिम विभाग), दत्तात्रय चव्हाण (गुन्हे शाखा ते वरिष्ठ निरीक्षक, खडकी पोलीस ठाणे), अजय चांदखेडे (वाहतूक शाखा ते वरिष्ठ निरीक्षक विश्रांतवाडी पोलीस ठाणे), संगीता पाटील (वाहतूक शाखा ते उत्तमनगर पोलीस ठाणे), सुनील तांबे (विशेष शाखा ते वरिष्ठ निरीक्षक कोथरुड पोलीस ठाणे), प्रमोद वाघमारे (अप्पर पोलीस आयुक्त वाचक ते पोलीस निरीक्षक गुन्हे सिंहगड रोड पोलीस ठाणे), किरण बालवडकर (कोथरुड ते वाहतूक शाखा), सुनील पंधरकर (वरिष्ठ निरीक्षक उत्तमनगर ते गुन्हे शाखा), अजित लकडे ( गुन्हे शाखा ते वाहतूक शाखा), विजयकुमार शिंदे (गुन्हे शाखा ते पोलीस निरीक्षक गुन्हे मुंढवा पोलीस ठाणे), विजय टीकोळे (गुन्हे शाखा ते वाहतूक शाखा), राजश्री गांधी (गुन्हे शाखा ते म.न.पा. अतिक्रमण), प्रतिभा जोशी (वरिष्ठ निरीक्षक कोथरुड ते वाहतूक शाखा), राजेंद्र सहाणे (पोलीस निरीक्षक गुन्हे दत्तवाडी ते आर्थिक गुन्हे व सायबर), बाजीराव मोळे (विशेष शाखा ते वाहतूक शाखा), अनिल नलावडे (म.न.पा. अतिक्रमण)