पुण्यातील २ महिला पोलीस निरीक्षकांसह तिघांची तडकाफडकी बदली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे पोलीस आयुक्तालयातील ३ पोलीस निरीक्षकांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये २ महिला पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे. हे बदलीचे आदेश गुरुवारी रात्री उशिरा काढण्यात आले आहेत.

बदली करण्यात आलेल्या पोलीस निरीक्षकाचे नाव आणि त्यापुढील कंसात कोठून कोठे बदली झाली हे पुढील प्रमाणे आहे.

१. नीलिमा नितीन पवार (गुन्हे शाखा ते कोर्ट कंपनी, मुख्यालय)
२. मनीषा संजय झेंडे (पोलिस निरीक्षक (गुन्हे), शिवाजीनगर ते नियंत्रण कक्ष)
३. राम सिद्राम राजमाने (कोर्ट कंपनी, मुख्यालय ते पोलीस निरीक्षक (गुन्हे), शिवाजीनगर)

चार ते पाच दिवसापूर्वीच पोलीस निरीक्षक मनीषा झेंडे यांची गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागातून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक (गुन्हे) अशी बदली करण्यात आली होती. मात्र, पुन्हा गुरुवारी रात्री त्यांची शिवाजीनगर येथून नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. एकंदरीत अचानक ३ पोलीस निरीक्षकांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

‘या’ पेयाचे नियमित सेवन करा आणि उत्तम आरोग्य मिळवा

सावधान ! ‘कॅन्सर’ला धुम्रपानापेक्षा लठ्ठपणा अधिक कारणीभूत

‘किडनी स्टोन’ वर घरगुती रामबाण उपाय

‘हे’ आहेत दही खाण्याचे फायदे