Pune : आयुक्तालयात आणखी 4 पोलीस निरीक्षकांच्या नेमणुका

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहर पोलीस दलातील चार पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदलून आल्यानंतर त्यांना पदभार देण्यात आला असून, अप्पर पोलीस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर यांनी हे आदेश दिले आहेत.

पोलीस निरीक्षक बदली

पोलीस निरीक्षक गोविंद गंभीरे (ठाणे शहर ते विशेष शाखा), अमृत देशमुख (पोलीस प्रशिक्षण केंद्र सांगली ते आर्थिक गुन्हे शाखा),सुभाष काळे (दशहतवाद विरोधी पथक ते विशेष शाखा) व हेमंत पाटील (बृहन्मुंबई ते गुन्हे शाखा)