Pune : विश्रामबाग विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांची बदली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहर पोलीस दलातील सहायक पोलीस आयुक्त यांची बदली केली असून, विश्रामबाग विभागाचे सहायक आयुक्त सुधाकर यादव यांची प्रशासन सहाय्यक आयुक्तपदी नेमणूक केली आहे. तर प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त मालोजीराव पाटील यांची विश्रामबाग विभागाचे सहाय्यक आयुक्त म्हणून नेमणूक केली आहे.

आज शहर पोलीस दलातील 9 पोलीस निरीक्षकासोबतच सहाय्यक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. आता बदल्यांचा वर्तुळ पूर्ण होत असून, आता कामगिरीचा आलेख उचवण्यासाठी नेमके काय पाऊल उचलले जाते, हे पाहणे महत्वाचे असणार आहे.