Pune : समर्थ, हडपसर, वारजे माळवाडी, लष्कर, दत्तवाडी, सिंहगड रोड पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पोलिस आयुक्तालयातील 5 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्याबाबतचे आदेश अप्पर आयुक्त (प्रशासन) जालिंदर सुपेकर यांनी काढले आहेत. शुक्रवारी देखील आयुक्तालयातील 9 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये देखील काही वरिष्ठ पोलिस निरीक्षकांचा समावेश होता.

बदली करण्यात आलेल्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची नावे आणि त्यापुढील कंसात कोठून कोठे बदली झाली हे पुढील प्रमाणे.

बाळकृष्ण सिताराम कदम (वपोनि, समर्थ पो.स्टे. ते वपोनि. हडपसर पो.स्टे.)

अशोक आनंदराव कदम (वपोनि, वारजे माळवाडी – संलग्न नियंत्रण कक्ष ते वपोनि, लष्कर पो.स्टे.)

देविदास काशिनाथ घेवारे (वपोनि, दत्तवाडी पो.स्टे. ते वपोनि. सिंहगड रोड पो.स्टे.)

नंदकिशोर माधव शेळके (वपोनि., सिंहगड रोड पो.स्टे. ते वाहतूक शाखा)

रमेश साहेबराव साठे (वपोनि, हडपसर पो.स्टे. ते विशेष शाखा)

शुक्रवारी करण्यात आलेल्या पोलिस निरीक्षकांच्या बदल्या खालील प्रमाणे –

सयाजी गवारे (गुन्हे शाखा ते वपोनि, अलंकार पोलिस स्टेशन)
जगन्नाथ कळसकर (फरासखाना पो.स्टे. ते वपोनि, भारतीय विद्यापीठ पो.स्टे)
विनायक साळुंखे (विशेष शाखा ते वाहतूक शाखा)
जयराम पायगुडे (गुन्हे शाखा ते वाहतूक शाखा)
दुर्योधन पवार (विशेष शाखा ते वाहतूक शाखा)
सरदार पाटील (विशेष शाखा ते वपोनि, कोंढवा पो.स्टे.)
दिपक लगड (वपोनि. डेक्कन – सलग्न, पोलिस आयुक्त यांचे वाचक ते गुन्हे शाखा)
विनायक गायकवाड (वपोनि. कोंढवा पो.स्टे. ते गुन्हे शाखा)
चंद्रकांत निंबाळकर (आर्थिक गुन्हे शाखा ते कोर्ट आवार)

पोलिस निरीक्षक दिपक लगड हे पोलिस आयुक्त यांचे वाचक म्हणून पुढील आदेश होईपर्यंत कामकाज पाहतील.

पोलिस निरीक्षक शिल्पा चव्हाण, नेमणुक गुन्हे शाखा (सध्या संलग्न वपोनि, अलंकार पो.स्टे.) यांना या आदेशाव्दारे त्यांच्या मुळ नेमणुकीच्या ठिकाणी परत करण्यात येत आहे.