कुविख्यात गुन्हेगार माधव वाघाटे खून प्रकरण आणि त्यानंतर निघालेली अंत्ययात्रेची रॅली ‘त्या’ 2 पोलीस निरीक्षकांना पडली महागात; वरिष्ठांकडून मोठी कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कुविख्यात गुन्हेगार माधव वाघाटेचे खून प्रकरण आणि त्यानंतर निघालेली अंत्ययात्रेची रॅली सहकारनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठांना चांगलीच भोवली असून वरिष्ठ निरीक्षक आणि निरीक्षक (गुन्हे) यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. अप्पर पोलीस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर यांनी बदलीचे आदेश काढले आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक गौतम गंभीरे यांची आर्थिक व सायबर गुन्हे शाखेत बदली केली आहे तर राजेंद्रकुमार कदम यांची गुन्हे शाखेत बदली केली आहे. आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक स्वाती देसाई यांची आता सहकारनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.