Pune : लॉकडाऊनमध्ये वाहतूक विभागानं केला 48 लाखाचा दंड वसूल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   लॉकडाउनच्या काळात पुणे पोलिसांच्या वाहतूक विभागाने तबल 48 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. विनाकारण बाहेर पडणाऱ्या नागरिकांवर कारवाई करत 36 हजार 318 वाहने जप्त केली होती. पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पार पाडून ती परत केली. त्यातून हा दंड वसूल झाला आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून संपूर्ण देश लॉकडाउन केला होता. शहरात देखील संचारबंदी लागू करण्यात आली होती. अत्यावश्यक कारणाशिवाय नागरिकांना बाहेर पडू नका, असे आवाहन पोलिसांनी केले होते. तरीही नागरिक वाहने घेऊन बाहेर फिरताना दिसून येत होते. यानंतर पुणे पोलिसांनी वाहने रस्त्यावर घेऊन येण्यास मनाई केली होती. तरीही काहीजण विनाकारण फिरत. मग पोलोसानी अशा वाहन चालकांवर कारवाईला सुरुवात केली. अनेकांची वाहने जप्त करण्यात आली होती. पुणे पोलिसांनी लॉकडाउनच्या काळात तब्बल 36 हजार 870 वाहने जप्त केली. तसेच, काही नागरिकांना बाहेर पडण्याचे कारण विचारणाऱ्या नोटीसा बजावल्या होत्या. जप्त केलेली वाहने पोलिस ठाणे परिसरात ठेवण्यात आली होती.

राज्य शासनाने अनलॉकची प्रक्रिया सुरू केल्यानंतर नागरिकांनी त्यांची वाहने परत देण्याची मागणी केली होती. त्यानुसार पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पार पाडून जप्त केलेली वाहने परत देण्यास सुरुवात केली. त्यानुसार पुणे पोलिसांनी आतापर्यंत जप्त केलेली बहुतांश वाहने परत केली आहे. जप्त केलेले वाहन सोडवून घेण्यासाठी चालकांकडून दंड आकारण्यात आला. त्यानुसार आतापर्यंत 48 लाख 7 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. आता फक्त साधारण पाचशे वाहने परत करण्यात आलेली नाहीत. त्यांच्या मालकांनी देखील पोलिसांशी संपर्क साधून दंड भरत ती वाहने घेऊन जावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.