Pune Triple Talaq Case | पुणे ट्रिपल तलाक केस : विवाहीतेचा शारीरिक, मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीला अटक ! सासु, सासरे, नणंद व नंदावाची अटकपुर्वसाठी न्यायालयात धाव

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Triple Talaq Case | विवाहीतेचा शारीरिक व मानसिक छळ (Crime Against Woman) करून तिला ट्रिपल तलाक देणार्‍या पतीस खडकी पोलिसांनी (Khadki Police Station) अटक केली असून न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. दरम्यान, पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर न्यायालयाने दि. 25 मे 2023 रोजी त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली असून त्याला जामीन मिळाला आहे. मात्र, सदरील प्रकरणातील सासु, सासरा, नणंद आणि नंदावा यांनी अटकपुर्व जामिन (Anticipatory Bail) मिळावा म्हणून न्यायालयात धाव घेतली आहे. (Pune Triple Talaq Case)

आकिब आयुब मुल्ला Aqib Ayub Mulla (31, रा. विश्राम सोसायटी, फ्लॅट नं. 4, नविन नाना पेठ, पद्मजी पार्क, पुणे) असे अटक झालेल्याचे नाव आहे.
त्याला दि. 23 मे 2023 रोजी खडक पोलिस स्टेशनमधील पोलिसांनी ट्रिलप तलकाच्या केसमध्ये अटक केली होती.
ट्रिपल तलकाच्या केसमध्ये पतीला अटक झाल्याची ही पुण्यातील पहिलीच घटना असावी असे सांगण्यात येत आहे.
यासंदर्भात 23 वर्षीय विवाहीतेने फिर्याद दिली असून त्यानुसार पती आकिब आयुब मुल्ला (31), सासु जाहीदा अय्युब मुल्ला (Zahida Ayub Mulla), सासरा अय्युब सिद्दीक मुल्ला (Ayub Siddique Mullah), नणंद फरीन सुफियान शेख (Freen Sufiyan Shaikh) आणि नंदावा सुफियान जावेद शेख (Sufian Javed Shaikh) यांच्याविरूध्द भादंवि कलम 498 (अ), 354, 323, 504, 34 सह मुस्लिम महिला (विवाहाच्या अधिकाराचे संरक्षण) कायदा 2019 चे कलम 4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

सदरील गुन्हा हा दि. 23 डिसेंबर 2022 ते दि. 17 एप्रिल 2023 दरम्यान नवीन नाना पेठ, पद्मजी पार्क लेन नंबर 3 मधील विश्राम सोसायटीच्या पहिल्या मजल्यावरील फ्लॅट नं 4 येथे घडला आहे.
आरोपींनी आपआपसात संगणमत करून फिर्यादी विवाहीवर संशय घेवून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला आहे.
तिला वेळावेळी घालून पाडून बोलले आहे.
एवढेच नव्हे तर दि. 17 एप्रिल 2023 रोजी आकिब आयुब मुल्लाने सर्वांसमोर फिर्यादीला तलाक, तलाक, तलाक
(Pune Triple Talaq Case) असे बोलून आज पासुन तुझा व माझा काहीएक संबंध नाही असे सांगितले आहे.

त्यानंतर फिर्यादीने खडकी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, दि. 23 मे 2023 रोजी आकिब आयुब मुल्ला (31) याला अटक करण्यात आली होती.
न्यायालयाने त्याला 2 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दि. 25 मे रोजी त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. आता न्यायालयाने त्याला जामिन दिलेला आहे.
पण, इतर आरोपींना अद्याप अटक झालेली नाही.
त्यांनी अटकपुर्व जामिन मिळावा म्हणून न्यायालयात धाव घेतली आहे.
अद्याप त्यांच्या अटकपुर्व जामिन अर्जावर सुनावणी होणे बाकी आहे.
गुन्हयाचा पुढील तपास खडकी पोलिस करीत आहेत.

Web Title :  Pune Triple Talaq Case | Husband arrested for physical and mental torture of marriage! Mother-in-law, father-in-law, Nanand and Nandava run to court for arrest

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

75 Rs New Currency Launch | अर्थमंत्रालाची घोषणा, बाजारात येणार ७५ रुपयांचे नवे चलन; नव्या संसद भवनाच्या उद्घाटनप्रसंगी करणार लाँच

Maharashtra Congress | नाना पटोलेंना पदावरुन हटवा, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या गटाची हायकमांडकडे मागणी: हायकमांड महाराष्ट्रात भाकरी फिरवणार?

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : मार्केटयार्ड पोलिस स्टेशन – रात्री क्रिकेट खेळणार्‍या मुलांना टोळक्याने केली मारहाण; मोटारसायकल, कारची केली तोडफोड

Pune Crime News | Food Delivery App चा अंमली पदार्थाच्या विक्रीसाठी वापर; 5 जणांना अटक, 53 लाखांचे ‘एलएसडी स्टॅम्प’ (Drugs) जप्त