पुण्यातील पाषाण तलावाजवळ जुळी जिवंत मुलं आढळल्याने सर्वत्र प्रचंड खळबळ

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – पुण्यातील पाषाण तलावाच्या परिसरातील जुळी जिवंत बाळ आढळून आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधून याची माहिती दिली असून, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

तर नागरिकही मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. ही जुळी मुले कोणाची आहेत, त्यांना तेथे कोण सोडून दिलं याबाबत पोलिसांचा तपास चालू आहे. पोलीस परिसरातील नागरिकांकडून अधिक माहिती घेत आहेत. बाळांच्या माता-पित्याचा शोध घेतला जात आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.


पाषाण परिसरात तलावाजवळ काही नागरिक सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास फेरफटका मारण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना तलावाच्या काठावर गोधडीत बांधलेली दोन बाळ होते. त्यांच्या रडण्याचा आवाज नागरिकांना ऐकू आला. त्यामुळे जवळ जाऊन पाहणी केली. त्यावेळी एक मुलगा आणि एक मुलगी जुळे असल्याचे निदर्शनास आले.

नागरिकांनी तत्काळ ही माहिती पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. डॉक्टराना बोलविण्यात आले. दरम्यान या घटनेची माहिती वाऱ्या सारखी पाषाण आणि औंध परिसरात पसरली. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात येथे धाव घेतली. मात्र या मुलांना पाहून नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

 

फेसबुक पेज लाईक करा –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like