पुण्यातील सिंहगड रस्त्यावर भरदुपारी ‘त्या’ महिलेचा खून करणारे दोघे ताब्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सिंहगड रस्ता परिसरातील तुकाईनगर परिसरात भरदिवसा झालेल्या महिलेचा खून केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे चौकशी सुरू करण्यात आली आहे. याप्रकरणी संशयित असणाऱ्या एका महिलेसह 5 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

मोनिका राम मदने (वय 30, रा. तुकाईनगर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी एका महिला आणि अल्पवयीन मुलांसह 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत मदने ही तुकाईनगर येथे राहते. दरम्यान गेल्या काही वर्षांपासून आरोपी आणि त्यांच्यात वाद आहेत. मदने हिने अनेकवेळा अवैध धंदे सुरू असल्याबाबत पोलिसांना माहिती देखील दिली होती. यामुळे वाद होत असल्याची माहिती आहे.

दरम्यान सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास बाथरूमला जात असताना अचानक तिच्यावर धारधार शस्त्राने वार करून आरोपींनी वार केले. तसेच तेथुन पळ काढला होता. पोलिसांनी माहिती मिळताच माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी अवस्थेत महिलेला ससून रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. यानंतर पोलिसांनी खून करूनपसार झालेल्या आरोपींचा माग काढला. यावेळी दोघाना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे तपास करण्यात येत आहे. अधिक तपास सिहंगड रोड पोलीस करत आहेत.