Pune : कात्रज परिसरात अंमली पदार्थाची विक्री, दोघांना गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   कात्रज परिसरात मॅफेड्रोनची (एमडी) या अमली पदार्थाची विक्री करताना दोघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून 10 लाख 63 हजार रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे.

विसारत अली सनीउल्ला (वय ३२, रा. धनकवडी, मूळ-बिहार) व ब्रीजेश उपेंद्र शर्मा (वय ३८, रा. मुंबई) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरात लॉकडाऊननंतर गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यानुसारच अमली पदार्थ तस्करी देखील वाढत असताना दिसून येत आहे. त्यानुसार पोलीस कारवाई करत आहेत. वेगवेगळ्या प्रकारे माहिती काढत असतानाच त्यांना पकडले जात आहे. अंमली व खंडणी विरोधी पथक पेट्रोलिंग करत असताना त्यांना कात्रज चौकात मुंबई बायपासकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोघेजण कारमधून मॅफेड्रोनची तस्करी करण्यासाठी आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने याठिकाणी सापळा रचून विसारत आणि ब्रीजेशला ताब्यात घेतले. त्यांच्या कारची झडती घेतली असता १० लाख ६३ हजार रुपये किमतीचे २१३ ग्रॅम मॅफेड्रोन जप्त करण्यात आले. त्याशिवाय कार व मोबाईल असा १५ लाख ७० हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

पोलीस उपायुक्त बच्चन सिंह, सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण बोराटे, पोलीस निरीक्षक विजय टिकोळे, सहायक पोलीस निरीक्षक बापू रायकर, कर्मचारी राहूल जोशी, शिवाजी राहिगुडे, प्रशांत बोमादंडी, मनोळ साळुंके, संतोष जाचक, विशाल शिंदे, चेतन गायकवाड, विशाल दळवी, चेतन शिरोळकर, अमित छडीदार योगेश मोहिते यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

You might also like