मालगाडीच्या धडकेत पुण्यात तरुण-तरुणीचा मृत्यू

पुणे/आकुर्डी : पोलीसनामा ऑनलाइन – लोहमार्ग ओलांडत असताना एका मालगाडीची धडक बसल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आकुर्डी रेल्वे स्थानकावर घडली. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली असून यामध्ये एका तरुणीचा आणि तरुणाचा मृत्यू झाला आहे. गौतमी महेंद्र जाधव (वय-29) आणि रवि चंदर पिलाव (वय- 35) असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौतमी आणि रवि यांची मालगाडीच्या धडकेत मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी आकुर्डी रेल्वे स्थानकावरून मालगाडी जात होती. गौतमी आणि रवी यांना मालगाडीची धडक बसली यामध्ये दोघांचा जगीच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
रवी आणि गौतमी हे दोघे आकुर्डी रेल्वे स्थानकावरील लोहमार्ग ओलांडत होते. त्यावेळी येणारी मालगाडी त्या दोघांना दिसली. मात्र, मालगाडी येत असतानाही या दोघांनी लोहमार्ग ओलांडण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना लोहमार्ग ओलांडता आला नाही. त्यांना भरधाव वेगात जाणाऱ्या मालगाडीची धडक बसली. यामध्ये गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

 

You might also like