Pune : कोविड जम्बो हॉस्पीटलमधील 2 डॉक्टरांनी 25 वर्षीय महिला डॉक्टरकडे केली चक्क शरीर सुखाची मागणी, अश्लील भाषेत बोलून केला विनयभंग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शिवाजीनगर येथील कोव्हिडच्या जम्बो रुग्णालयात एका महिला डॉक्टरचा दोन सहकाऱ्यांनी शरीर सुखाची मागणी करत तिला अश्लील भाषेत बोलुन विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रुग्णालयातून एक रुग्ण महिला देखील गायब झाली होती. त्यात हा प्रकार उजेडात आला आहे.

याप्रकरणी डॉ. योगेश भानूशाला/भद्रा व डॉ. अजय बागलकोट यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत २५ वर्षीय महिला डॉक्टरने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला डॉक्टर आहेत. आरोपी डॉ. योगेश व डॉ. अजय व पीडित महिला डॉक्टर या गेल्या काही दिवसापासून येथील शिवाजीनगर जम्बो कोविड रुग्णालयात कार्यरत आहेत. गेल्या काही दिवसापासून आरोपी डॉक्टर हे पीडित डॉक्टर तरुणीला स्पर्श होईल असे वागत असे. तर तिच्याकडे शरीर सुखाची मागणी करत होते.

मात्र तरुणीने याला विरोध करत प्रशासनाकडे तक्रार केली होती. मात्र प्रशासनाकडून काही झाले नाही. त्यानंतर या दोघांनी तिला आमची तक्रार करते का असे म्हणत पुन्हा शरीर सुखाची मागणी करत न ऐकल्यास आम्हाला सर्व काही करता येत असे म्हणत तिला अश्लील भाषेत बोलत तिचा विनयभंग केला. सततच्या त्रासाला कंटाळुन या महिला डॉक्टर तरुणीने शेवटी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तिघेही डॉक्टर एका खासगी कंपनीच्यावतीने जम्बो रुग्णालयात कार्यरत आहेत.

मागील १५ दिवसांपासून संबंधित डॉक्टर महिला डॉक्टराला त्रास देत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक मनीषा झेंडे या करत आहेत. दरम्यान हा सर्व धक्कादायक प्रकार प्रशासनाला सांगितल्यानंतर देखील त्यावर कारवाई काहीच झाली नसल्याचे दिसत आहे. त्यामुळेच या दोन डॉक्टरांचे धाडस वाढले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like