Pune : कात्रज नवीन बोगद्याजवळ दुचाकी स्लिप होऊन झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कात्रज नवीन बोगद्याजवळ दुचाकी स्लिप होऊन झालेल्या भीषण अपघातात दोघांची मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. यातील एकाची ओळख पटलेली नाही. घटनास्थळी भारती विद्यापीठ पोलीस दाखल झाले आहेत.

अभिषेक किशोर कदम (25) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. तर धाबनगावे (पूर्ण नाव पत्ता नाही) हे जखमी झाले आहेत. त्यांना भारती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. तर 40 वर्षीय व्यक्ती देखील या अपघातात मृत्यू झाला आहे. पण, त्याची ओळख अद्याप तरी पटलेली नाही. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कदम व धाबनगावे हे दुचाकीवरून जात होते. यावेळी कात्रज नवीन बोगद्याजवळ त्यांची दुचाकी स्लिप झाली आणि हा अपघात झाला, असे प्राथमिक माहिती आहे. यात कदम यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अनोळखी व्यक्तीला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पण, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तर धाबनगावे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना भारती विद्यापीठ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

दरम्यान माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. अनोळखी व्यक्ती चालत असावी, त्याला दुचाकी चालकांनी उडवले असावे असेही घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. अधिक तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.