Pune : पुण्यात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याची आणखी दोन प्रकरण समोर; गुन्हे दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याची आणखी दोन प्रकरण समोर आली आहेत. याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. एका घटनेत फेसबुक आणि ट्विटरवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिमा मलिन होईल आणि त्यांच्या घटनात्मक पदाची प्रतिमा बिघडवणाऱ्या पोस्ट टाकल्या; तर मुस्लिम व हिंदू धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. दुसऱ्या प्रकरणात शरद पवार, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, संजय राऊत, राहुल गांधी, सोनिया गांधी आक्षेपार्ह व बदनामीकारक पोस्ट टाकण्यात आल्या आहेत.

याप्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर पोलीस ठाण्यात अजहर अहमद खान (वय 37) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार प्रदीप गावडे नावाच्या फेसबुक व ट्विटर खाते असणाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. प्रदीप गावडे याच्या फेसबुक व ट्विटरवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिमा मलिन होईल आणि त्यांच्या घटनात्मक पदाची प्रतिमा बिघडवणाऱ्या पोस्ट टाकल्या आहेत. तर मुस्लिम व हिंदू धर्मात तेढ निर्माण होईल व त्यातून दंगली घडव्या, रक्तपात व्हावा अशा पोस्ट टाकण्यात आल्या आहेत. हा प्रकार समोर आल्यानंतर खान यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली आहे.

तसेच दुसऱ्या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, राहुल गांधी, सोनिया गांधी, संजय राऊत यांच्यासह महापुरुषांबाबत आक्षेपार्ह व बदनामीकारकअसा मजकूर फेसबुक, ट्विटर आणि इतर सोशल मीडियात पसवरण्यात आला आहे. याबाबत जयदीप पडवळ (40) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार वापरकर्ते याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सायबर पोलीस करत आहेत.