Pune : उरुळी देवाची परिसरात लघुशंकेसाठी थांबलेल्या दोघांना कारमधून आलेल्या तिघांनी चाकूच्या धाकाने लुटले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  उरुळी देवाची परिसरात लघुशंकेसाठी थांबलेल्या दोघांना कारमधून आलेल्या तिघांनी चाकूच्या धाकाने लुटल्याची घटना घडली. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात 37 वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यानुसार कारमधील तीन अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे फुरसुंगी परिसरात राहतात. ते आणि त्यांचे सहकारी हे रात्री साडे आकरा वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून जात होते. यादरम्यान ते उरुळी देवाची येथे आल्यानंतर सुदर्शन मोटार्स येथे लघुशंका करण्यासाठी थांबले होते. यावेळी कारमधून आलेल्या तिघांनी त्यांच्याकडील चाकू काढत तो फिर्यादी यांच्या कंबरेला लावला आणि त्यांच्याजवळ असलेले मोबाईल चोरून नेले. चोरटे पसार झाल्यानंतर त्यानी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. अधिक तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत.