Pune : पुण्यात प्रेम संबंधातून बलात्काराच्या दोन घटना; लग्नाचे आमिष दाखविले…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   पुण्यात ओळख अन ओळखीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर तरुणांनी तरुणीवर बलात्कार केल्याचा दोन वेगवेगळ्या घटना उघडकीस आल्या आहेत. दुसरीकडे
दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचारांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. खडक व भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटणा घडल्या आहेत.

पहिल्या घटनेत खडक पोलीस ठाण्यात एका 26 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार 27 वर्षीय तरुणासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी व आरोपी हे एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत होते. यावेळी त्यांची ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात होते. हात फायदा घेत आरोपीने फिर्यादी तरुणीला लॉजवर घेऊन जात तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. तरुणी गर्भवती राहिल्यानंतर त्यांनी तिचा गर्भपात केला. तसेच वारंवार तिला मारहाण करत तिच्याकडे पैशाची मागणी केली. 2014 पासून हा प्रकार सातत्याने सुरू होता. पण, तरुणाने त्रास देण्यातस सुरुवात केली. यामुळे कंटाळून शेवटी तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली. तसेच त्याने तरुणीकडून 20 लाख रुपये घेतले होते. ते तो परत देत नव्हता. फिर्यादी तरुणीने तक्रार केली असता त्याने 10 लाख रुपये तरुणीला परत दिले. तसेच हा गुन्हा मागे घेण्यास सांगितले होते, असे तक्रारीत म्हंटले आहे. खडक पोलिसांनी गुन्हा दाखल करत तो भारती विद्यापीठ पोलीसांकडे वर्ग केला आहे.

तसेच दुसरा प्रकार हा भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे हद्दीत घडला आहे. याप्रकरणी एका 24 वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. त्यानुसार धायरी येथे राहणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी एकमेकांच्या ओळखीचे असून त्यांच्यात प्रेमसंबंध होते. तरुणाने फिर्यादी तरूणीला लग्नाचे अमिश दाखवून तिच्याशी शरीर संबंध ठेवले. तर तरुणीचे नग्न अवस्थेतील फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिली. अधिक तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.