पुण्यामध्ये भरधाव दुचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भरधाव वेगात जाणाऱ्या दुचाकीस्वाराची धडक रस्त्याने पायी जाणाऱ्या एका वृद्ध इसमाला बसली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या 75 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवार (दि.15) सायंकाळी साडे सहाच्या सुमारास जांभुळकर चौक ते फातिमानगर चौक रोडवर माय गुरुकुल नर्सरी स्कूल समोर झाला. अपघातामध्ये दुचाकीस्वार जखमी झाला असून त्याच्यावर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रघुनाथ शंकर बधे (वय-75 रा. विठ्ठल मंदिरा जवळ, वानवडी गाव, पुणे) असे मृत्यू झालेल्या वृद्ध व्यक्तीचे नाव आहे. तर अवनित विनोद भंडारी (वय-36 रा. मोर्चा अपार्टमेंट, एनआयबीएम रोड, कोंढवा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून पंकज बधे (वय-25 रा. वानवडी) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रघुनाथ बधे हे पायी जात असताना जखमी अवनित भंडारी हा वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून भरधाव वेगात जात होता.

माय गुरुकुल नर्सरी स्कुल समोरील साईसागर हॉटेल जवळ भंडारी याच्या अ‍ॅक्टीव्हा दुचाकीची धडक रघुनाथ बधे यांना बसली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या रघुनाथ यांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. अपघातामध्ये अवनित भंडारी हा देखील जखमी झाला आहे. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला असून अद्याप अटक केलेली नाही. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पी.डी. पोटवडे करीत आहेत.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like