Pune | पुण्यात बेरोजगार झालेल्यांना मिळणार रोजगाराची संधी ! पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने घेतला पुढाकर, जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune | कोरोनाच्या पहिल्या व दुसरर्‍या लाटेचा अनेकांना रोजगार गमवावा लागला. तर काहींना कोरोनाला घाबरून पुणे सोडले. यामुळे शहरातील अनेक क्षेत्रात संध्या कुशल आणि अकुशल कामागारांची कमतरात निर्माण झाली आहे. ही पोकळी भरून काढण्यासाठी पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने (Pune District Legal Services Authority) पुढाकर घेतला आहे.

‘जिल्हा विधी सेवा प्राधिकरण’ (District Legal Services Authority), ‘सिम्बायोसिस लॉ स्कूल, पुणे’ (Symbiosis Law School, Pune), ‘डिवाईन जैन ग्रुप ट्रस्ट’ (divine jain group trust) आणि ‘ललिता मोतीलाल सांकला फाउंडेशन (lalita motilal sankala foundation) यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार मेळाव्याचा उपक्रम हाती घेतला आहे. ज्यात औद्योगिक, बांधकाम, हाऊसकिपींग आणि सुरक्षा कर्मचारी यांच्यासाठी त्यात रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे, अशी माहिती प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश संजय ए. देशमुख ( Chief District and Sessions Judge Sanjay A. Deshmukh) यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रताप सावंत (District Legal Services Authority Secretary Pratap Sawant) , सिम्बायोसिस लॉ कॉलेजच्या संचालिका डॉ. शशिकला गुरपूर (The director of Symbiosis Law College, Dr. Shashikala Gurpur), ललिता मोतीलाल सांकला फाउंडेशनचे अध्यक्ष सनी सांकला (Sunny Sankla, President of Lalita Motilal Sankla Foundation) आणि डिवाईन जैन ग्रुप ट्रस्टचे अध्यक्ष संकेत शहा (Sanket Shah, Chairman, Divine Jain Group Trust) यावेळी उपस्थित होते.

कामगारांनी न्यायालयात अर्ज केल्यानंतर त्यांची तटताळणी केली जाईल.
त्यानंतर कामगारांचे अर्ज संबंधित कंपन्यांना पाठविण्यात येणार आहे.
अर्जदाराला कोणत्या कामात रस आणि माहिती आहे, त्यानुसार त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येईल.
नऊ सप्टेंबरपर्यंत  जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पहिला मजला, नवीन इमारत, जिल्हा न्यायालय, शिवाजीनगर (Shivajinagar Court)आणि [email protected] येथे अर्ज करावेत, असे सचीव सावंत यांनी सांगितले.

मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध :

चाकणसह (Chakan) परिसरात सध्या नवीन उद्योग सुरू होत आहेत.
तर सध्या सुरु असलेल्या उद्योगांकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. त्यामुळे उत्पादन कमी झाले आहे.
या आद्योगिक वसाहतीमध्ये मोठा प्रमाणात रोजगार उपलब्ध आहे.
त्याचा गरजुंनी लाभ घ्यायला हवा, असे शहा आणि सांकला यांनी सांगितले.

Web Title :  Pune | Unemployed people in Pune will get employment opportunities! Pune District Legal Services Authority took the initiative, find out

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Anil Deshmukh | अनिल देशमुखांच्या अडचणीत आणखी भर; 2 सहकाऱ्यांवर ED कडून आरोपपत्र दाखल

Pune Crime Branch Police | अग्नीशस्त्र बाळगणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक, 1 पिस्तुलासह काडतुस जप्त

ISRO Recruitment 2021 | तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी ! इस्रो LPSC मध्ये ‘या’ पदासाठी लवकरच होणार भरती, 63200 सॅलरी