Pune University | भारतातील पहिला सावित्रीबाई फुलेंचा पुर्णाकृती पुतळा पुणे विद्यापीठात उभारणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune University | विद्येच्या माहेर घरातील पुणे विद्यापीठाला (Pune University) क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांचं नाव दिलं. मात्र त्यांचा पुर्णाकृती पुतळा नव्हता. आता भारतातील पहिला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा पहिला पूर्णाकृती पुतळा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मुख्य इमारतीसमोरील जागेत उभारला जाणार आहे. ज्या ठिकाणी पुतळा बसवला जाणार आहे त्या जागेचे भुमीपूजन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या हस्ते रविवारी (दि. 28) रोजी झाले.

मागील काही वर्षापासून विविध संस्था ,संघटनांकडून विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांचा पुतळा बसवण्याची मागणी करण्यात आली. त्यावर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने पुतळा बसवण्यास मान्यता दिली. विद्यापीठ आवारात बसवण्यात आलेल्या महात्मा फुले यांच्या पुतळ्याजवळच सावित्रीबाई फुले यांचा पुतळा उभारण्यासाठी जागा विद्यापीठ प्रशासनाने (University Administration) निश्चित केली आहे. मात्र, समता परिषदेच्या पदाधिका-यांनी त्यावर आक्षेप घेतल्याने स्वत: भुजबळ यांनी यात लक्ष घातले आहे. (Pune University)

सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांच्या जयंती निमित्त येत्या 3 जानेवारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पुतळ्याचे अनावरण होणार आहे. येत्या 20 डिसेंबरपर्यंत पूर्णाकृती पुतळा विद्यापीठाच्या ताब्यात मिळणार आहे. त्यामुळे लवकरच विद्यापीठात पुतळा उभा राहणार आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी नुकतीच छगन भुजबळ (Chhagan Bhujbal),उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday samant), जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त, पुरातत्त्व विभाग, कला संचालनालय, वन विभाग आदी पदाधिका-यांची बैठक घेऊन पुतळा बसवण्याच्या प्रक्रियेस तत्वत: मंजूरी दिली. म्हणून, विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोरील गार्डनमधील जागा निश्चित केलीय. ही जागा मुख्य इमारतीमधील ज्ञानेश्वर सभागृहाच्या विरूध्द बाजूस आहे. त्या ठिकाणी पुतळा उभारला जाणार आहे.

Web Title :- Pune University | first full size statue savitri bai phule country will be erected pune university Chhagan Bhujbal

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Price Today | सोने आज 242 रुपयांनी महागले, चांदीच्या दरात 543 रुपयांची उसळी; जाणून घ्या नवीन दर

Winter session 2021 | राज्यसभेत गोंधळ घालणार्‍या 12 खासदारांचं निलंबन; काँग्रेससह शिवसेनेच्या दोघांचा समावेश

Parambir Singh and Sachin Vaze | परमबीर आणि वाझे यांच्यात त्यावेळी केबिनमध्ये तासभर चर्चा; मुंबई पोलिस चौकशी करणार

Parambir Singh and Sachin Vaze | परमबीर आणि वाझे यांच्यात त्यावेळी केबिनमध्ये तासभर चर्चा; मुंबई पोलिस चौकशी करणार

Maharashtra Cabinet Decision | महानगरपालिका, नगरपरिषद निवडणुकांसाठी उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ

Pension Scheme SWP | करोडपती बनण्याचा हिट फॉर्म्युला ! 100 रुपये वाचवा आणि मिळवा 35,000 मासिक पेन्शन, येथे जाणून घ्या कॅलक्युलेशन